शहीद अग्रमान रहाटे परिवाराला रिपाईंची पाच लाखांची सांत्वनपर मदत जाहीर
यवतमाळ :
यवतमाळ जिल्ह्यातील तरोडा गावातील शहिद अग्रमान रहाटे यांच्या कुटुंबियांची केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपाईं (ए ) चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी सांत्वनपर भेट घेऊन पाच लाख मदतीची घोषणा केली .
गडचिरोली येथील नक्षलवाद्यानी केलेल्या भुसुरुंग स्फोटात सोळा पोलीस जवान शहीद झाले होते . त्यात यवतमाळ जिल्ह्यातील अग्रमान रहाटे यांचा समावेश होता . त्यांच्या निवासस्थानी जाऊन ना. रामदास आठवले यांनी शोकाकुल शहीद रहाटे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी रिपब्लिकन पक्षातर्फे शहिद रहाटे परिवाराला सांत्वनपर मदत म्हणून पाच लाख रुपये देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
No comments:
Post a Comment