किनवटमध्ये तालुकास्तरीय योग शिबीरात १७५० जणांनी केली योग साधना - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, June 21, 2019

किनवटमध्ये तालुकास्तरीय योग शिबीरात १७५० जणांनी केली योग साधना


किनवट ( शब्दांजली कानिंदे ) :
शुक्रवारी ( ता. २१ )  श्री गजानन महाराज संस्थान सभागृह, किनवट येथे  आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त किनवट तालुका प्रशासन व तालुका क्रीडा अधिकारी यांच्या वतीने मनसब योगसाधना केंद्राच्या सहयोगातून घेण्यात आलेल्या 'तालुकास्तरीय योग शिबीरात '  एक हजार सातशे पन्नास जणांनी केली योगसाधना .
              सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल व तहसिलदार नरेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका प्रशासनाच्या वतीने सकाळी सहा ते सात या वेळात मुख्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
              नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, माजी नगराध्यक्ष के. मूर्ती, गटविकास अधिकारी सुभाष धनवे, मुख्याधिकारी माधव लोखंडे , प्रा. किशनराव किनवटकर, अभियंता प्रशांत ठमके, नरसिंग सातुरवार, ज्येष्ठ पत्रकार प्रदीप वाकोडीकर, प्रा.डॉ. शुभांगी दिवे या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन  करण्यात आले. अतिथींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत झाले.
              कार्यक्रम संयोजक तालुका क्रीडा अधिकारी विलास चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. आयुष मंत्रालयाची योग तज्ज्ञ परीक्षा उत्तीर्ण झालेले मनसब योगसाधना केंद्राचे साधक देविदास मुनेश्वर यांनी आपल्या खास शैलीत योगाचे महत्व विशद करत सर्वांकडून योगाभ्यास करवून घेतला.त्यांना योगसाधक किरण तिरमनवार, बाळासाहेब भुतनर, किशन गुरनुले, सुरेंद्र राठोड, बाबाराव भगत, जीवन राठोड, सुनिल आईटवार, अशोक जाधव , काशीनाथ भिसे आदिंनी सहकार्य केले. बालाजी इंदुरकर यांनी मंगल मैत्री गीत व प्रार्थना मंजूळ स्वरात सादर केली.

 योग शिबीराच्या यशस्वीतेसाठी संस्थानचे सचिव आर.आर. दारमवार, तहसिलचे नायब तहसिलदार सर्वेश मेश्राम, व्ही.एस. गौरवार, अर्चना कर्णेवाड , न.प. मुख्याधिकारी श्री लोखंडे , गट विकास अधिकारी श्री धनवे व गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने यांच्या नेतृत्वाखालील सर्व अधिकारी -कर्मचारी, राम बुसमवार , सय्यद फरहान , संदीप यशीमोड, क्रीडा संकुलचे राजू, आकाश, आतिश आदिंनी परिश्रम घेतले. योग तज्ज्ञप्रा. आनंद सरतापे यांनी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय घोटी येथे , पांडूरंग भालेराव यांनी उपजिल्हा रुग्णालयात व व्यंकट सातुरवार यांनी सरस्वती विद्यामंदीर शाळा किनवट येथे योगाभ्यास घेतला. प्राचार्य डॉ.एस.एस. बेंबरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व विभागीय समन्वयक प्रा.डॉ. पंजाब शेरे यांच्या नेतृत्वात बळीराम पाटील महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक नांदेड येथील राज्यस्तरीय योग शिबीरात सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News