नांदेड :
येथील विश्वदीपनगर , तरोडा (बुद्रूक ) येथील रहिवाशी दादाराव नागोराव पवळे ( वय ६२ वर्ष यांचे शुक्रवारी (ता. २१ ) " ब्रेन हॅमरेज " झाले . ते बीएसएनएलमध्ये मेकॅनिक म्हणुन कार्यरत होते. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी दादाराव पवळे यांच्या "अवयव दानाचा" निर्णय घेतला आहे .
काही वेळात मुंबईच्या डॉक्टरांची टीम थोड्याच वेळात शहरातील ग्लोबल हॉस्पीटल येथे पोहचणार आहे.
त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी एखाद्याला जीवदान मिळावे व प्राण वाचावा म्हणून फार महत्वाचा निर्णय घेतला आहे . त्यांच्या पश्चात पत्नी लक्ष्मीबाई पवळे, पुत्र नामदेव पवळे, सिद्धार्थ पवळे, मुली पद्मिनी सांडुले , मीना पवळे आहेत.
अवयवदानात फुफ्फुस , हृदय , यकृत , डोळे व किडनी या अवयवांचा समावेश आहे. यानिमित्तानं नांदेडात पुन्हा एकदा " ग्रीन कॉरीडार " होणार आहे.




No comments:
Post a Comment