199999 संविधानाच्या उद्देशिका व महानायक प्रतिमांचे पोहरा देवी यात्रेत मोफत वाटप उपक्रम : एकाच वेळी दोन विश्वविक्रम ( INTERNATIONAL BOOK OF RECORD ) - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, July 4, 2019

199999 संविधानाच्या उद्देशिका व महानायक प्रतिमांचे पोहरा देवी यात्रेत मोफत वाटप उपक्रम : एकाच वेळी दोन विश्वविक्रम ( INTERNATIONAL BOOK OF RECORD )




पुणे ( शब्दांजली कानिंदे ) : 
        बंजारा समाजाचे आदरस्थान संत  सेवालाल महाराज संदेशभूमी तीर्थक्षेत्र पोहरादेवी ( वाशीम ) , महाराष्ट्र येथे पारंपारिक यात्रा महोस्तवा निमित्त शुक्रवारी (ता.12 एप्रिल 2019 )  भारतीय संविधानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी तसेच संविधानातील मूल्यांचे महत्व पटवून देण्यासाठी संविधान उद्देशिकेच्या  'एक लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव (199999) प्रती  जगभरातून आलेल्या समस्त भाविकांना मोफत  वाटप करण्यात आल्या . याबाबीची     इंटरनॅशनल बुक ऑफ रिकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. तसेच बंजारा समाजाचे आदरसस्थान संत  सेवालाल महाराज, याडी सामकी माता व हरितक्रांतीचे प्रणेते महाराष्ट्र राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री  वसंतरावजी नाईक  यांच्या  नऊ हजार नऊशे नव्याण्णव (9999) प्रतिमेचे  अॅड. रमेश खेमू राठोड यांनी मोफत वाटप केले. यातून सामाजिक एकीकरणाचा अनमोल संदेश सर्वदूर पोहचविला याची दखल घेऊन  इंटरनॅशनल बुक ऑफ रिकॉर्ड यांनी दोन विश्वविक्रमाची नोंद घेतली आहे.
          माजी खासदार तथा विद्यमान आमदार हरिभाऊ राठोड,अॅड सुधाकर आव्हाड ,बार्टीचे आरती डोळस ,शंकर पवार स ..,पोलिस दिनेश राठोड  यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाने तसेच अरविंद जाधव ,प्रा.पृथवीराज राठोड,अॅड विकास राठोड ,प्रशांत पवार ,हृषीकेश चव्हाण ,सचिन जाधव ,संदीप राठोड ,सिद्धी हलगे आदिंसह  परिवारातील सर्वांच्या सहकार्यामुळेच सदरचे विश्वविक्रम यशस्वी करण्यात आले असल्याचे अॅड. डॉ. रमेश राठोड यांनी सांगितले .

                    सदर विश्वविक्रम नोंद झाल्याबद्दल शनिवारी (ता. 29 जून 2019 ) शिवाजीनगर,पुणे येथे अॅड.धनश्री बोराडे ,अॅड चित्रा जानुगडे ,अॅड संध्या शिंदे ,अॅड. प्राजक्ता श्रीखंडे ,पत्रकार संजीवनी कदम ,अॅड. सोनाली घाडगे , नेहालिका चव्हाण ,हिमेश राठोड,पूनम राठोड,रोहित राठोड,योगेश राठोड,पद्मा राठोड,पूजा राठोड,आरती राठोड,प्रदीप राठोड,निकिता राठोड,रत्नंजय राठोड,गणेश नारवाडे व इतर असंख्य मान्यवरांनी अॅड. डॉ. राठोड यांचे कौतुक करुन अभिनंदन केले. यावेळी अभिनंदन व कौतुक करण्यासाठी आलेल्या मान्यवरांना वृक्ष देवून आभार व्यक्त करण्यात आले.







No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News