विवाह संस्कार सोहळ्यात 'समाजसेवकांच्या सन्मानाचा ' नवा पायंडा - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, July 6, 2019

विवाह संस्कार सोहळ्यात 'समाजसेवकांच्या सन्मानाचा ' नवा पायंडा


किनवट ( शब्दांजली कानिंदे ) :
निवृत्त जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी आपल्या मुलीच्या विवाह संस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रात दैदिप्यमान कार्य करणाऱ्या 'समाजसेवकांच्या सन्मानाचा '  कार्यक्रम आयोजित करून समाजासमोर नव्या पायंड्याचा प्रारंभ केला आहे.
             तरोडा ( बुद्रूक ) , नांदेड येथील हल्ली निवासी तथा जयभीमनगर, किनवट येथील मूळ रहिवाशी सेवानिवृत्त जिल्हा माहिती अधिकारी रामचंद्र विठ्ठलराव देठे व रेखा देठे यांची द्वितीय सुकन्या अभियंता पूनम हिचा विवाह शोभाबाई गंगाधर वासाटे यांचे ज्येष्ठ सुपूत्र अभियंता दयानंद यांचेशी रविवारी ( ता. ७ ) सकाळी ११ .४० वाजता स्मृतिशेष काशिराम देठे नगरी, कलावती गार्डन , किनवट येथे आयोजित केला आहे.
             या विवाह संस्कार सोहळ्याआधी सकाळी १०.३० वाजता ८६ व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र व साधने प्रकाशन समिती, महाराष्ट्र राज्याचे मा . सदस्य सचिव प्रख्यात आंबेडकरी नाटककार प्रा. दत्ता भगत व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ , औरंगाबादचे माजी मराठी विभागप्रमुख तथा लोकसाहित्याचे अभ्यासक, कवी 'वडारवाडीकार '  प्रा.परशूराम गिमेकार यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवकांचा सन्मान करण्यात येणार आहे.
             सन्मानार्थी असे ( कंसात क्षेत्र ) : अभियंता प्रशांत ठमके ( शिक्षण ) , अरूण आळणे ( धम्मप्रसार व विवाह मेळावा ) , शकिलोद्दीन बडगुजर व साजिदोद्दीन बडगुजर ( पत्रकारिता ) , अॅड. मिलिंद सर्पे ( ग्रंथालय चळवळ ) सर्व किनवट , भीमराव हटकर ,नांदेड ( अॅट्रॉसिटी ) , प्रकाश गायकवाड, पडसा , माहूर ( सर्वधर्मीय विवाह मेळावा ) , दिगांबर भवरे , कृष्णापूर, उमरखेड ( कृषी ) , श्रीरंग पाटील, कृष्णापूर, उमरखेड - मुंबई ( उद्योग ) , धर्माजी देठे , नांदेड ( शिस्तपालन ) , देविदास मुनेश्वर, गोकुंदा -किनवट ( योग तज्ज्ञ ) , विश्वनाथ घुले ,दराटी -उमरखेड (शिक्षण ) , विठ्ठलराव भुरे , नांदेड ( उद्योग )
             हा अनोखा कार्यक्रम आयोजित करून रामचंद्र देठे यांनी डीजेच्या धांगडधिंग्यात वरात काढून शुभाषीष देण्यासाठी आलेल्या सर्व आप्तेष्ठ व मान्यवरांचा अनमोल वेळ वाया घालवणारांच्या डोळ्यात जळजळीत अंजन घातले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News