किनवट :
येथील बळीराम पाटील महाविद्यालया वाणिज्य विभागाच्या वतीने काॅमर्स असोशियएशनची स्थापना करण्यात आली असून ए. डी. श्राॅफ स्मरनार्थ वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.
प्राचार्य डाॅ. एस. के. बेंबरेकर कार्यक्रमाचे अध्यक्ष होते ; तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री दत्त महाविद्यालय, हदगाव येथील डाॅ. एस. बी. अडकिने हे होते. सदरिल कार्यक्रम किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. यावेळी डाॅ. अडकिने यांनी काॅमर्स ससोशिएशनचे कार्य करतांना कसे भू नियोजन करावे व वाणिज्य विभागातील विविध स्पर्धांचा लाभ विद्यार्थ्यांनी कसा घ्यावा या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत अडगुलवार ,सचिव आदर्श राणे, सहसचिव अनिकेत पोहूरकर, सदस्य शेख सलेहा व शामल चाटे यांची निवड करण्यात आली. वाणिज्य मंडळ स्थापनेचा उद्देश विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व व सर्वांगीण विकास व्हावा तसेच वाणिज्य क्षेत्रातील चालू घडामोडी बाबत माहिती असावी हा आहे. ए. डी. श्राॅफ वत्कृत्व स्पर्धेत ९ विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले. त्या मधून प्रथम सोनाली कांबळे,द्वितीय शेख सलेहा व तृतीय आर्षद खान यांना रोख पारितोषिक अनुक्रमे अडीच हजार, दीड हजार व एक हजार देण्यात आले. प्रा.डाॅ. एस. बी. अडकिने, प्रा. यू. जी. इंगोले वप्रा.एम. के. जोनपेल्लीवार हे परिक्षक होते. वाणिज्य मंडळाचा पहिला उपक्रम म्हणुन "यशस्वी महिला उद्योजिका व स्वच्छ भारत अभियान " या दोन भिंतीपत्रकांचे प्रकाशन प्रा.डाॅ. एस. बी. अडकिने व प्रा.एम.के. जोनपेल्लीवार यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख डाॅ. एस.एल. दिवे ब सूत्रसंचालन प्रा.आम्रपाली हटकर यांनी केले.डाॅ. स्वाती कुमरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.ऋचा जन्नावार, प्रा.शिल्पा सर्पे व प्रा. डाॅ. रेड्डी आदिंनी परिश्रम घेतले.




No comments:
Post a Comment