निवडणूक अधिसूचना जारी : पहिल्याच दिवशी किनवट विधानसभा मतदारसंघात १२ जणांनी घेतले ३६ अर्ज ;परंतु नामनिर्देशन दाखल 'निरंक ' - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, September 28, 2019

निवडणूक अधिसूचना जारी : पहिल्याच दिवशी किनवट विधानसभा मतदारसंघात १२ जणांनी घेतले ३६ अर्ज ;परंतु नामनिर्देशन दाखल 'निरंक '


किनवट :
भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीची घोषणा केली असून ८३- किनवट विधानसभा मतदारसंघातून एका सदस्याची विधानसभा २०१९ साठी निवडणूक घ्यावयाची सूचना प्रसिद्ध करण्यात येत असून शुक्रवारी ( दि. २७ सप्टेंबर ) सकाळी ११ वाजतापासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात नामनिर्देशनपत्रे घेऊन दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. पहिल्याच दिवशी बारा उमेदवारांनी छत्तीस नामनिर्देशनपत्रे स्विकारलीत ;परंतु एकानेही नामनिर्देशनपत्र दाखल केले नाही. पहिल्याच दिवशी नामनिर्देशन दाखल 'निरंक ' असल्याची माहिती सहायक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

                 नामनिर्देशनपत्रे उमेदवाराला किंवा त्यांच्या कोणत्याही सूचकाला, निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, किनवट किंवा तहसिलदार , किनवट तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडून शुक्रवारी ( दि. २७ सप्टेंबर ) ते शुक्रवारी ( दि. ४ ऑक्टोबर ) सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही दिवशी ( सार्वजनिक सुटी व्यतिरिक्त ) या कालावधीत  मोफत घेऊन उपविभागीय अधिकारी कार्यालय, किनवट येथे दाखल करता येईल.
                 नामनिर्देशनपत्राची छाननी शनिवारी (दि. ५ ऑक्टोबर ) सकाळी अकरा वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय, किनवट येथील सभागृहात करण्यात येईल. उमेदवारी मागे घेण्याबद्दल सूचना उमेदवाराला किंवा त्याच्या कोणत्याही सूचकाला किंवा उमेदवाराने लेखी प्राधिकार दिलेल्या निवडणूक प्रतिनिधीला सोमवारी ( दि. ७ ऑक्टोबर ) दुपारी तीन वाजेपर्यंत देता येईल . निवडणूक लढविली गेल्यास सोमवारी ( ता. २१ ऑक्टोबर ) सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल.
                 नामनिर्देशन दाखल करण्यासाठी उमेदवारास येतांना निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयापासून १०० मीटर अंतरावरील परिसरात   तीन वाहनाचा वापर करता येईल व त्यांच्या कक्षात उमेदवारांसा पाच व्यक्तींनाच आणता येईल. स्वतःचा फोटोग्राफर , व्हिडीओग्राफर वा मोबाईलचा वापर करता येणार नाही.यावेळी कोणत्याही घोषणा देता येणार नाहीत, वाद्य वाजविता येणार नाही. शुक्रवारी ( दि. ४ ऑक्टोबर ) दुपारी तीन वाजेपर्यंत हे लागू राहील असेही सहायक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल व तहसिलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नरेंद्र देशमुख यांनी कळविले आहे.
                 उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मारोती थोरात यांनी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात व परिसरात चोख पोलिस बंदोबस्त लावला होता. तो नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत असेल.



No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News