किनवट :
दिव्यांगासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर रॅम्प, व्हिलचेअर, पिण्याचे शुद्ध पाणी, शौचालय, ने- आण करण्याची सुविधा, लाईट व सावली आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत; तेव्हा सर्व दिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल ( भाप्रसे ) यांनी केले आहे.
83-किनवट विधानसभा मतदार संघातील दिव्यांग मतदारांना मतदान प्रक्रिया सुलभ व्हावी व त्यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून दिव्यांग मतदार सहायता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तहसिलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नरेंद्र देशमुख, सर्वेश मेश्राम व मुख्याधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विद्या कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कांबळे एम.एम. , वायकुळे एम.बी., कांबळे पी.जी.,अस्वले बी. एम.,बनकर ए.व्ही., बिरादार एस.एम., वडजे व्हि.बी., शिंदे बी.बि., गंगाखेडकर एस.पी. आदि कर्मचारी या कक्षाचं काम यशस्वीपणे सांभाळत आहेत.
या कक्षातील सर्व कर्मचारी मतदारसंघातील 328 मतदान केंद्रावर जाऊन सुविधांची तपासणी करत आहेत. तसेच सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ( बी.एल. ओ. ) यांच्या सहकार्याने सर्व दिव्यांग मतदारांना भेटून त्यांच्यासाठी मतदान केंद्रावर करण्यात येणा-या सुविधांची माहीती देऊन त्यांना मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत.






No comments:
Post a Comment