" माझ्या दादा रं ... चल मतदान करा या जाऊ... " अशी साद घालत स्वीपकक्षाने निवडणूकीवर बहिष्कार टाकलेल्या अतिदुर्गम पिंपळशेंड्यात केले प्रबोधन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, October 19, 2019

" माझ्या दादा रं ... चल मतदान करा या जाऊ... " अशी साद घालत स्वीपकक्षाने निवडणूकीवर बहिष्कार टाकलेल्या अतिदुर्गम पिंपळशेंड्यात केले प्रबोधन


किनवट :

...किती सांगु तुले ताई ...
मतदानाची ही घाई ...
किती समजाऊ तूले मी भाऊ...
माझ्या दादा रं ....
चल मतदान कराया जाऊ..
माझे ताई गं....
चल मतदान कराया जाऊ...

              अशा गीतातून मतदारांना मनपरिवर्तनाची हाक देण्याचं काम किनवटच्या स्वीप कक्षाने (दि.18 ) तालुका मुख्यालयापासून बासष्ट किलोमीटर अंतरावर असलेल्या व विधानसभा निवडणूकीवर बहिष्कार टाकलेल्या अतिदुर्गम पिंपळशेंडा  गावात जाऊन केलं.
        जायला रस्ता नाही; त्यामुळे मांडवीते पिंपळशेंडा ( 17 किमी ) रस्ता दोन्हीही नाल्यावरील पुलासह मंजूर करावा. दोन -दोन दिवस विद्युत पुरवठा खंडीत असतो ; तो नियमीत व्हावा अन्यथा विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीवर बहिष्कार टाकत असल्याचे निवेदन नागेश भुरेसह ईतर ग्रामस्थांनी दिले.
               83-किनवट विधानसभा मतदार संघाचे  सहायक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अ‍धिकारी अभिनव गोयल (भाप्रसे ), तहसिलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नरेंद्र देशमुख, सर्वेश मेश्राम व मुख्याधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विद्या कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीपकक्ष प्रमुख गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने यांच्या नेतृत्वाखाली प्रा.डॉ. मार्तड कुलकर्णी, प्रा.डॉ. पंजाब शेरे, उत्तम कानिंदे, रमेश मुनेश्वर, रुपेश मुनेश्वर, बी.आर. इंदूरवार या कलावंतांनी साहेबराव वाढवे, संतोष बम्पलवार व सजन उपवार यांच्या साथीने ' मतदार जनजागृतीचा ' शाहीरी जलसा सादर केला.

            तेलंगाणा, विदर्भ व मराठवाड्याच्या सिमेवर असलेल्या पैनगंगा नदीतीरापार असलेल्या पिंपळशेंडा या गावात जायला पक्का रस्ता नाही. रस्ता करायचा तर नागापूर मार्गे तेलंगाणा लागतो व लिंगीतांडा मार्गे वनविभागाची चार हेक्टरपेक्षाही जास्त जमीन हा सर्वात मोठा अडथळा. मांडवीवरून 7 किलोमीटर तेलंगाणामधील करंजी-रामपूर ( टेकडी ), कोजनगुडा फाटा- घुबडी या गावातून दोन मोठे वाहते नाले पार करून  पायपीट करत 10 किलोमीटर अंतर कापल्यानंतर महाराष्ट्राची सीमा त्यानंतर अति दूर्गम पिंपळशेंडा गाव लागतं. कुडाच्या घरासमोर स्वच्छतेचा संदेश देणारे शौचालय दिसत असले तरी;ईतर योजना अद्यापही तिथे पोहचल्या नाहीत.पेसा निधीतून डिजीटल शाळा झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेनुसार गुणवत्तेचा ध्यास घेऊन या गावात नियमीत जाऊन शिक्षकांनी प्रभावी शिक्षण तेवढे पोहचविले. म्हणूनच ईतरही योजना पोहचण्याची आशा दाखवत गायक रुपेश मुनेश्वर यांनी
         
भारताच्या विकासाचे 
स्वप्न आता पाहूया
स्वप्न आता पाहूया
मतदान करुया हो 
मतदान करुया...

असे आवाहन केले ; तर
प्रा.डॉ. पंजाब शेरे यांनी

लोकशाहीला बळकट करीन
मतदान मी कराया जाईन...

अशी साद घातली. त्यानंतर कवी रमेश मुनेश्वर यांनी

आनंद झाला माझ्या मनाला
मतदानाचा दिवस उगवलाय हो...
माझा मतदार राजा मतदान करण्यास चाललाय हो....
अशी आशा व्यक्त केली.

शाहीर प्रा.डॉ. मार्तंड कुलकर्णी यांनी पहाडी आवाजात पोवाडा सादर करून पहाडातल्या मतदारांच्या अंगावर शहारे आणले. सूत्रधार तथा मिडीया कक्ष सहायक उत्तम कानिंदे यांनी गामस्थांच्या मनाचा ठाव घेत बहिष्कार मागे घेऊन मतदानाचा हक्क बजाविण्याचे आवाहन करून उपस्थित ग्रामस्थाचे आभार मानले .

1 comment:

  1. 👌👌👌👌nice माणूसच माणसाला जागवतो

    ReplyDelete

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News