किनवट ( नांदेड ) :
तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघाच्या वतीने पंडीत जवाहरलाल नेहरु जयंती दिवस "बालक दिन " म्हणून गुरुवारी ( दि. 14 ) करीमाबाद गृहनिर्माण संस्थेतील डायमंड ज्युबली इंग्रजी शाळेत साजरा करण्यात आला.यावेळी न्यायमुर्ती जहांगीर पठाण यांनी मार्गदर्शन केले.
मंचावर न्यायमुर्ती जे. एन.जाधव, वकील संघाचे उपाध्यक्ष अॅड.मिलिंद सर्पे, सचिव अॅड.दिलीप काळे, सहसचिव अॅड.राहुल सोनकांबळे, ज्येष्ठ अॅड.अनंत वैद्य, अॅड.पंकज गावंडे, विधिमंडळ सेवा समितीचे सदस्य के.मुर्ती, पत्रकार गोकुळ भवरे, अॅड. टी. एच. कुरेशी, अॅड. टेकसिंग चव्हाण, पोलिस निरीक्षक मारोती थोरात, पोलिस उपनिरीक्षक श्री.पवार यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
प्रारंभी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते स्वतंत्र भारताचे पहिले प्रधाममंत्री पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संस्थेच्या सचिव यास्मिन जिवाणी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. शमिम गौरी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी साक्षि चिबडे व यशस्वी चौदंते या मुलींनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी न्यायालयीन कर्मचारी एल.वाय.मिसलवार,एस.डी.चव्हाण, शेख मकदुम, पोलिस उकंडराव राठोड व एस.बी.दोनकलवार, यांच्यासह रविता राठोड, कादंबरी वावळे, सुप्रिया लोमटे, माधवी राठोड, वर्षा रामतिर्थकर, विजया श्रीराममोजवार, मिनाक्षी काळे, सलिमा सुदामनिया, ज्योती बर्डे, दीक्षा राऊत यांनी पुढाकार घेतला.




No comments:
Post a Comment