गुणवत्तेत उत्कृष्ट तालुक्यातील सव्वीस शाळांच्या मुख्याध्यापक व विषय शिक्षकांना शाळारंभाच्या पहिल्याच दिवशी थेट शाळेत जाऊन मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्या अभिनंदन पत्राने गौरविणार - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, November 13, 2019

गुणवत्तेत उत्कृष्ट तालुक्यातील सव्वीस शाळांच्या मुख्याध्यापक व विषय शिक्षकांना शाळारंभाच्या पहिल्याच दिवशी थेट शाळेत जाऊन मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्या अभिनंदन पत्राने गौरविणार




किनवट  :
 भाषा व गणित या विषयात तालुक्यातून गुणवत्तेत  उत्कृष्ट असणाऱ्या सव्वीस शाळांच्या मुख्याध्यापक व  विषय शिक्षकांना शाळारंभाच्या पहिल्याच दिवशी गुरुवार ( दि.14 ) रोजी  थेट त्यांच्या शाळेत जाऊन मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी दिलेले अभिनंदन पत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. अशी माहिती गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने यांनी दिली.
           विविध इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने विद्या प्राधिकरणामार्फत निर्देश दिले आहेत. त्यानुसार अध्ययन-अध्यापन निश्चितीचे मापदंड अंतिम करण्यात आले असून या मानांकनानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती होणे अनिवार्य आहे. आरटीई 2009 नुसार गुणवत्तापूर्ण शिक्षण हे आनंददायी पद्धतीने विद्यार्थ्यांना मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. तो त्यांना देणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.
            या अनुषंगाने जून ते सप्टेंबर 2019 या कालावधीसाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळेतील इयत्ता दुसरी ते आठवीच्या अध्ययन स्तर निश्चितीबाबत वर्गातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक गुणवत्तेचे मूल्यमापन करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेनुसार व शिक्षणाधिकारी ( प्रा ) प्रशांत दिग्रसकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यानुसार दि.14 ऑक्टोबर रोजी तालुक्यातील मुख्याध्यापकांचीआढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत असे दिसून आले की, भाषा व गणित विषयात 26 शाळा ह्या तालुक्यातील दहा उत्कृष्ट शाळांपैकी आहेत. ही बाब अत्यंत अभिमानाची आणि वाखाणण्यासारखी आहे.
            विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवून त्यांना भाषा व गणित विषयात गोडी निर्माण केल्याबद्दल शिकवणारे वर्गशिक्षक, विषय शिक्षक आणि ज्ञानदानाचे काम जोमात चालू ठेवण्यासाठी आणि या शिक्षकांचे नेतृत्व केल्याबद्दल मुख्याध्यापक यांना दीपावली सुट्यानंतर शाळारंभाच्या पहिल्याच  दिवशी गुरुवार ( दि.14 ) रोजी परिपाठात शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्या स्वाक्षरीचे अभिनंदन पत्र देऊन गौरविण्यात येणार आहे
            गणित व भाषा अध्ययन-अध्यापनात शैक्षणिक साहित्याचा वापर, ग्रंथालयातील पुस्तकांचा वापर, गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना लोकसहभागाच्या माध्यमातून शिष्यवृत्ती व बक्षिसे देणे, माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेणे, सर्व विद्यार्थी मुले-मुली भविष्यात स्वतःच्या पायावर उभे राहून नोकरी-व्यवसायात पुढे जातील अशी सक्षमता निर्माण करण्याचे काम शिक्षकांच्या हातून व्हावे, पर्यावरण संवर्धनासाठी, 'एक मूल एक झाड' हे उद्दिष्ट दिले आहे. ट्री कार्डवर याबाबतच्या नोंदी नेमाने घेणे याबाबत शक्यतो सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहनही या अभिनंदन पत्रात केले आहे.       
            यासर्व शाळेच्या गुणवत्तेचे अंतिम मूल्यमापन मार्च 2020 मध्ये करण्यात येईल. मुख्याध्यापकांनी सादर केलेल्या अध्ययन स्तर चाचणीच्या आकडेवारीची पडताळणी ही तपासणी पथकामार्फत करण्यात येईल. मार्च 2020 अखेर ह्या शाळा जिल्ह्यातील पहिल्या दहा शाळांमध्ये मानांकन मिळविण्यासाठी शिक्षकांनी कठोर परिश्रम घ्यावेत अशी अपेक्षाही या पत्रात व्यक्त केल्या आहेत.
            तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या उत्कृष्ट 26 शाळा अशा : बेदी, बेंदीतांडा, भिसी, भुलजा, बोधडी (बुद्रुक ), दाभाडी, धामनदरी, सुभाषनगर, हुडी, रोहीदास तांडा, लोणी, मांडवा, मरकागुडा,मुळझरा,तळ्याची वाडी, नवरगाव, पांगरी, पार्डी -बोधडी ( खुर्द ),परोटीतांडा, दुधगाव, सिंगारवाडी, सोनवाडी, रामन्नानाईक तांडा, उनकेश्वर, वाळकी ( बुद्रूक ) ,खेडी


" तालुक्याच्या 50 वर्षाच्या शैक्षणिक इतिहासात मुख्याध्यापकांची पहिल्यांदाच तालुकास्तरावर आढावा बैठक घेतली. त्यातून गुणवत्ता वाढीचा उपक्रम सर्वांना शेअर केला.आरोग्य, पर्यावरण व शिक्षण यांची योग्य सांगड घातली.
-अशोक काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी


" काव्याशास्त्र विनोदेने कालो गच्छति धिमतास " , अशा जुन्या संस्कृत सुभाषितामध्ये म्हटल्याप्रमाणे काव्यशास्त्र मीमांसा यामध्ये विद्वान आपला सर्वाधिक वेळ व्यतीत करतात, असे जुने जाणते द्रष्ट्या लोकांचे मत आहे. शिक्षक बंधुंनो आपणही या मार्गावरून चालता चालता आपल्या विद्यार्थ्यांनाही चालण्यास प्रवृत्त करावे.
- प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी ( प्रा ), जि.प. नांदेड

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News