ग्राम पंचायतीच्‍या 66 कर्मचा-यांना जिल्‍हा परिषदेत नियुक्‍त्या - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, November 30, 2019

ग्राम पंचायतीच्‍या 66 कर्मचा-यांना जिल्‍हा परिषदेत नियुक्‍त्या



नांदेड :
जिल्‍हा परिषदेच्‍या रिक्‍त जागांच्‍या दहा टक्‍के आरक्षणानुसार जिल्‍हयातील ग्राम पंचायत कर्मचा-यांना जिल्‍हा परिषदेत शासन निर्णयानुसार प्रदान केलेल्‍या अधिकारानुसार मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी गट क व गट ड मध्‍ये पदस्‍थाना देण्‍यात आल्‍या आहेत. आज शुक्रवार दिनांक 29 नोव्‍हेंबर रोजी जिल्‍हा परिषदेच्‍या  यशवंतराव चव्‍हाण सभागृहात जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा शांताबाई पवार जवळगावकर यांच्‍याहस्‍ते नियुक्‍तीचे आदेश देण्‍यात आले. यावेळी मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, उपाध्‍यक्ष समाधान जाधव, अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, जि.प. सदस्‍य तथा माजी जि.प. अध्‍यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, मुख्‍य लेखा व वित्‍त अधिकारी रावसाहेब कोलगणे, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले, व्‍ही.आर. कोडेंकर, दिलीप इंगोले, व्‍ही.आर. पाटील, जिल्‍हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी पवार, समाजकल्‍याण अधिकारी एस.यू. आऊलवार आदींची उपस्थिती होती.
जिल्‍हा परिषदेच्‍या रिक्‍त पदाच्‍या दहा टक्‍के आरक्षणानुसार ग्राम पंचातीमध्‍ये ज्‍या कर्मचा-यांची सेवा दहा वर्ष पूर्ण झाली आहे, तसेच रिक्‍त पदाच्‍या उपलब्‍धतेनुसार व शैक्षणिक पात्रतेनुसार नियुक्‍त्‍या देण्‍यात आले आहेत. यामध्‍ये 35 परिचर, 16 ग्रामसेवक, 14 आरोग्‍य सेवक व 1 पशुधन पर्यवेक्षकांच्‍या नियुक्‍त्‍यांचे आदेश मान्‍यवरांच्‍या उपस्थितीत देण्‍यात आले आहेत. यापूर्वी 2016 मध्‍ये ग्राम पंचायत कर्मचा-यांना 10 टक्‍के आरक्षणानुसार नियुक्‍त्‍या देण्‍यात आल्‍या होत्‍या. जिल्‍हा परिषद पदाधिकारी व अधिकारी यांच्‍या पुढाकाराने अनुकंपा पाठोपाठ आता ग्राम पंचायतीच्‍या कर्मचा-यांना नियुक्‍त्‍या देण्‍यात आल्‍या आहेत. यावेळी माजी जिल्‍हा परिषद अध्‍यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, उपाध्‍यक्ष समाधान जाधव, अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे व जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा शांताबाई पवार जवळगावकर यांनी मनोगत व्‍यक्‍त करुन नवनियुक्‍त कर्मचा-यांना शुभेच्‍छा दिल्‍या आहेत.

 नवीन पर्वाला सुरुवात
गेल्‍या अनेक वर्षापासून ग्राम पंचायतीमध्‍ये कर्मचारी म्‍हणून काम करणा-यांना आज जिल्‍हा परिषदेने पदस्‍थापना देऊन नियुक्‍त्‍या दिल्‍यामुळे नवनियुक्‍त कर्मचा-यांनी आनंद व्‍यक्‍त करुन पदाधिकारी व अधिका-यांचे आभार मानले आहेत. आता आमच्‍या नवीन पर्वाला सुरुवात झाली असून आम्‍ही नियुक्‍ती दिलेल्‍या ठिकाणी रूजू होऊन प्रामाणिकपणे काम करणार असल्‍याचे नियुक्‍त्‍या दिलेल्‍या कर्मचा-यांनी सांगितले.

1 comment:

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News