धन्य जोतीराव...! - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, November 28, 2019

धन्य जोतीराव...!






(शोषित-पिडीत सामान्यांने शिक्षण घेतल्याने धर्म बुडतो म्हणणा-यांना... जोतीरावांनी सर्व सामान्यांना  शिक्षण देऊन..मोठी चपराकच मारली... स्मृतीदिना निमित्य त्यांना विनम्र अभिवादन... राष्ट्रपिता जोतीरावजी फुले यांच्या पावन स्मृतिंना अभिवादन करणारी
---प्रा.नंदू वानखडे ,मुंगळा जि.वाशिम यांची कविता
-संपादक, निवेदक न्यूज )


    धन्य जोतीराव...!

   ---प्रा.नंदू वानखडे ,मुंगळा जि.वाशिम -9423650468


जोतीने शिकविले ,शिक्षणाचे मर्म
बुडाला का धर्म, सांगा गडे....?

धर्म बुडणार ,बोंबलूनी सांगती
किती कपटी निती, सांगा भाऊ...!


शिकू नये कोणी ,रहावे आडानी
डोळा यावे पाणी ,जन्मोजन्मी...!


बोलू नये कुणी, वेदाची ती वाणी
त्याने तुमची हानी ,होईल गा...!


किती शिक्षणाची, दाखविती भिती
ओळखा काय चित्ती,असेल गा...?

किती ज्योतीबाने ,सोसलेत वार..
केले ऊपकार, देशावरी...!"

जोती -सावित्रीने,करूनी अभ्यास
भरविला घास,शिक्षणाचा...!


गेल्या असत्या सती,मेल्यावर पती
सावित्रीची गती ,कामी आली...!


जाती -सावित्रीचा ,करावा गजर
दिलिया नजर ,शिक्षणाची...!"


देशाने साधली ,आज जी प्रगती
निश्चितच जोती,तयामागे....!"


शिका शिका सारे ,सांगे ज्योतीराव
आपोआप भाव ,येई तुम्हा...!

धन्य ती सावित्री ,धन्य जोतीराव
शिक्षणाचे गाव ,वसविले...!"


-प्रा.नंदू वानखडे ,
मुंगळा जि.वाशिम
9423650468

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News