शैक्षणिक गुणवत्तेत तालुक्यातील दहा शाळांतून उत्कृष्टतेबद्दल लोणी शाळेस सिईओचे 'अभिनंदन पत्र 'बहाल - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, November 28, 2019

शैक्षणिक गुणवत्तेत तालुक्यातील दहा शाळांतून उत्कृष्टतेबद्दल लोणी शाळेस सिईओचे 'अभिनंदन पत्र 'बहाल




किनवट : 
      शैक्षणिक गुणवत्तेत तालुक्यातील दहा उत्कृष्ट शाळेत अव्वल ठरल्याबद्दल  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,लोणी येथील मुख्याध्यापक व शिक्षक यांना मुख्यकार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी दिलेले 'अभिनंदन पत्र ' प्रभारी गट शिक्षणाधिकारी सुदर्शन मेश्राम यांनी प्रत्यक्ष शाळेत जाऊन बहाल केले.
       कमठाला केंद्रातील उपक्रमशील शाळा म्हणून नावाजलेल्या लोणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गुणी शिक्षकांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवून त्यांना भाषा व गणित विषयात गोडी निर्माण केली. शैक्षणिक गुणवत्तेत तालुक्यातील दहा उत्कृष्ट शाळेपैकी लोणीची एक शाळा असल्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी  ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांना 'अभिनंदन पत्र ' देऊन प्रात्साहित करण्याचा उपक्रम राबविला.  मुख्याध्यापिका वर्षा कुलकर्णी,राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक रमेश मुनेश्वर, शिक्षिका शाहिन बेग व विद्या श्रीमेवार यांना प्रभारी गटशिक्षणाधिकारी सुदर्शन मेश्राम यांच्या हस्ते ' अभिनंदन पत्र ' देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रभारी शिक्षणविस्तार अधिकारी शिवाजी खुडे, मानव विकासचे समन्वयक उत्तम कानिंदे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदीप गुंजकर, उपाध्यक्ष निळकंठ पाटील गुंजकर, रोहिदास तांड्याचे मुख्याध्यापक प्रशांत शेरे उपस्थित होते. रमेश मुनेश्वर यांनी सुत्रसंचालन करुन आभार मानले.



जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रोहिदास तांडा ही शाळा सुध्दा शैक्षणिक गुणवत्तेत उत्कृष्ट ठरल्या बद्दल मुख्याध्यापक प्रशांत शेरे व राज्य पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षिका शालिनी सेलूकर यांनाही अभिनंदन पत्र प्रदान करून गौरविले.

1 comment:

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News