किनवट :
संविधानाच्या मुळाशी असलेले व्यापक असे मानवतावादी तत्वज्ञान, संविधानाने पुरस्कारिलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, मानवता, धर्मनिरपेक्षता, सहकार ही महामूल्य भारतीय जनमानसात खोलवर रुजली तर भारतीय लोकशाही खऱ्या अर्थाने यशस्वी होईल. असे प्रतिपादन प्रभारी गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने यांनी केले.
मंगळवारी (दि. २६ ) सकाळी ११वाजता येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात शिक्षण विभागाच्यावतीने आयोजित केलेल्या स्मार्ट गर्ल प्रशिक्षणाचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी केंद्रिय मुख्याध्यापक राम बुसमवार, उत्तम कानिंदे, गट साधन केंद्र समन्वयक संजय कांबळे, विषय तज्ज्ञ एस.एन. ब्राह्मण, बोलेनवार प्रमुख अतिथी होते.
सावित्रीमाई फुले व राष्टूनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पार्पण करून वंदन केले. केंद्र प्रमुख श्रीमती भद्रे यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन घेतले. उत्तम कानिंदे यांनी संविधान दिनाबद्दल विस्तृत माहिती दिली. मास्टर ट्रेनर वर्षा कुलकर्णी व शालिनी सेलूकर यांनी मनोगत व्यक्त केले.
विषय तज्ज्ञ आशा येडे यांनी सूत्रसंचालन केले. डी.बी. मोगरकर यांनी आभार मानले. तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षिका उपस्थित होत्या.
आंजी येथे ७० वा भारतीय संविधान दिवस उत्साहात संपन्न
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंजी येथे भारतीय संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सदरील कार्यक्रमासाठी केंद्राचे केंद्रप्रमुख पी.जी. होळकर ,पोलिस पाटील धरमसिंग चाहेल, अंगणवाडी सेविका सरपंच रेणुकाबाई रनमले, मारोती रनमले, साहेबराव शेळके, भगवान कांबळे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष चरणसिंग चाहेल उपस्थित होते. मुख्याध्यापक रविंद्र चौधरी यांनी या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सुरवातीला हातात संविधान जागृतीचे फ्लेक्स घेऊन विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी द्वारे संविधानाची जनजागृती केली. त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या व संविधानाच्या प्रतिमांचे पूजन व पुष्पहार अर्पण करून उपस्थितांचा सत्कार केला. नंतर संविधानाचे वाचन घेऊन शशिकांत कांबळे सरांनी संविधानाचे अधिकार कर्तव्य जागरूकता याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. मुख्याध्यपकांनी प्रास्ताविकात संविधानाच्या कलम व त्यांचा उपयोग स्पष्ट केला. त्यानंतर विद्यार्थ्यांचे भाषण , गीते, मनोगत घेण्यात आले.
अध्यक्षीय समारोप करतांना केंद्र प्रमुख होळकर यांनी संविधानाच्या निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान व आपल्यावर केलेल्या अनंत उपकारांची माहिती दिली. तसेच 26/11 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शाहिद झालेल्या पोलीस अधिकारी यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली.शेवटी शशिकांत कांबळे यांनी आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.
महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, गोकुंदा
महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात अाला. प्रारंभी प्राचार्य अार. जी. वाघमारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. पर्यवेक्षक शेख हैदर यांनी संविधान प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन केले.
. यावेळी प्राचार्या स्वाती डवरे, उप प्राचार्य सुभाष राऊत, उप मुख्याध्यापक जुम्माखान पठाण, पर्यवेक्षक प्रा. संतोष बैसठाकुर, महेंद्र नरवाडे, किशोर डांगे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रवी भालेराव यांची उपस्थिती होती .यानंतर सांस्कृतिक विभाग प्रमुख बंडू भाटशंकर यांनी घोषवाक्याच्या माध्यमातून संविधानाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. त्यानंतर गोकुंदा येथील मुख्य रस्त्याने संविधान प्रास्ताविका घेऊन ढोलताशासह विद्यार्थ्यांची भव्य फेरी काढण्यात आली. यामध्ये प्राथमिक, माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील बहुसंख्य शिक्षक, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
बळीराम पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने भारतीय संविधान दिन
बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष किनवट शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष गंगारेड्डी बैनमवार, महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ .एस. के .बेंबरेकर, उपप्राचार्य राजकुमार नेम्मानीवार, प्रा.डि.पी. चंदेले, माजी पर्यवेक्षक पी. एन. उत्तरवार रासेयो कार्यक्रम अधिकारी तथा रासेयो उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार प्राप्त प्रा. डॉ. पंजाब शेरे, प्रा. उमाकांत इंगोले विचारमंचावर उपस्थित होते. प्रारंभी महामानव,भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधान प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. डॉ. पंजाब शेरे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. मार्गदर्शनातून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानातून सर्वांचे हित जोपासले.सर्वांना हक्क अधिकार दिले.अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य, मतदानाचा हक्क, विविध क्षेत्रात नोकरीची संधी, समानता, न्याय, समता, बधुंता, ही मूल्य भारतीय संविधानाने दिले आहे.भारतीय संविधानातू लोकशाही प्रस्थापित झालेली आहे. सगळयात मोठी लोकशाही संविधानाने भारताला दिलेली आहे.असे सांगून भारतीय संविधान उद्देशिका वाचन करण्यात आले.भारतीय संविधानाची शपथ विद्यार्थ्यांना देण्यात आली. याप्रसंगी रासेयो सल्लागार डॉ.आनंद भालेराव, अंबादास कांबळे, डॉ. के.जी.कारामुंगे,डाॅ.रत्ना कोमावार, डॉ. प्रज्ञा घोडवाडीकर, प्रा. डॉ. सुरेंद्र शिंदे,प्रा.मंदाकिनी राठोड, प्रा. सुलोचना जाधव, डॉ.लता पेंडलवार, प्रा. पुरुषोत्तम येरडलावार, प्रा. एम. आय. पवार, डॉ. गजानन वानखेडे, प्रा. किशन मिराशे, प्रा.शिल्पा सर्पे, प्रा.दयानंद वाघमारे, कार्यालयीन अधीक्षक राजेंद्र धात्रक, सी.के.जाधव,यमुना कुमार, लक्ष्मीबाई पुठ्ठावार, मिलिंद लोकडे,आशा शिरपूरकर, सुधीर पाटील, आदींनी पुष्पवाहून अभिवादन केले.
सुमतिबाई हेमसिंग नाईक कन्या माध्यमिक विद्यालय,किनवट येथे मुख्याध्यापिका संगीता राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान दिना निमित्त प्रभात फेरी काढुन निबंध स्पर्धेचे आयोजण करण्यात आले.
संविधान दिनानिमित्त माणिक माध्यामिक विद्यालय चिखली बु येथे प्रभातफेरी काढण्यात आली व शाळेत विद्यार्थ्याचे भाषण तसेच मु.अ. तीगोटेसर व सर्व कर्मच्यारी यांनी अनमोल मार्गदर्शन केले.
उत्तमराव राठोेड आदर्श विद्यालय गोकुंदा येथे संविधान दिवस साजरा करन्यात आला
छत्रपती शिवाजी हायस्कूल बेलोरी (धा )
छत्रपती शिवाजी हायस्कूल बेलोरी (धा ) येथेमुख्याध्यापक सुरेश पाटील सोळंके यांच्या मार्गदर्शना खाली संविधान दिनाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ८ -३० वाजता संविधान दिना निमित शाळेपासुन विद्यार्थांची बॅड, लेझीम पथकासह घोषणा देत बेलोरी (धानोरा ) गावात प्रभात फेरी काढण्यात आली. गावातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉ. बाबासाहेबाच्या प्रतिमेचे पुजन आदिवासी विकास प्रकल्प स्तरीय आढावा समिती किनवटचे अध्यक्ष भगवानराव हुरदुके , सरपंच शामराव हुरदुके, संस्थापक तथा मुख्याध्यापक सुरेश पाटील सोळंके , उपसरपंच किशन गारोळे, धानोरा तांड्याचे उपसरपंच गणेश आडे, पोलिस पाटील देविदास चव्हाण, देवराव गारोळे, आशोक सरोदे , माधव कांबळे , गंगाधर सरोदे व इतर गावातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सह शिक्षक मधुकर पप्पुलवाड यांनी संविधानाबद्दल विस्तृत माहिती सांगीतली. त्यानंतर संविधान प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वितेसाठी शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
जि प हा कोसमेट ता किनवट संविधान दिन साजरा
संत भगवान बाबा मा. वि. सावरगाव तांडा येथे संविधानदिन ऊत्साहात साजरा करण्यात आला.
कै.प्रल्हादरावजी गरुड माध्यमिक
व संत ज्ञानेश्वर उच्च मा.विद्यालय ईस्लापुर या विद्यालयात' संविधान दिन ' प्रभात फेरी काढुन व वकृत्व स्पर्धा घेवून साजरा करण्यात आला.
मातोश्री पार्वती पाळवदे माध्यमिक विद्यालय सिंगारवाडी शाळेतील संविधान दिनानिमित्त प्रभात फेरी व विविध कार्यक्रम घेण्यात आले.
श्रीमती यशोदाबाई जोगी विद्यालय,दहेली येथे भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.प्रसंगी कु.मनिषा राठोड व कु.भाग्यश्री जाधव यांचा वाढदिवस पेनी वाटप करून साजरा करण्यात आला.
No comments:
Post a Comment