काव्यलेखनात महेंद्र नरवाडे, कथालेखनात आनंद गायकवाड तर काव्य गायनात रुपेश मुनेश्वर प्रथम - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, November 10, 2019

काव्यलेखनात महेंद्र नरवाडे, कथालेखनात आनंद गायकवाड तर काव्य गायनात रुपेश मुनेश्वर प्रथम



नांदेड :
          दीपावली निमित्त 'एक तरी दिवा लाव' या विषयावर घेण्यात आलेल्या विविध जिल्हास्तरीय स्पर्धेचा निकाल नुकताच जाहिर करण्यात आला. काव्यलेखन प्रथम सांगावाकार महेंद्र नरवाडे ( किनवट ), कथालेखन प्रथम आनंद गायकवाड ( मुखेड ), काव्यगायन प्रथम रुपेशकुमार मुनेश्वर ( किनवट ) कलाअविष्कार प्रथम रेखा मनोजकुमार सुरवसे ( इंदापूर, पुणे ) क्रमांकाने यश मिळविल्याबदल त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
        अखिल भारतीय शिक्षक साहित्य, कला, क्रिडा मंच महाराष्ट्रने दीपावली निमित्त आयोजीत राज्यस्तरीय स्पर्धेला जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. काव्यलेखन स्पर्धेत प्रथम महेंद्र नरवाडे ( किनवट )  व्दितीय सोनबा दवणे ( हदगाव ), तृतीय किरण कदम चव्हाण ( नायगाव ), उत्तेजनार्थ संध्या रायठक धुतडे ( नांदेड ), राजू बनसोडे ( अहमदनगर ), रजनी गोडबोले ( पुणे ), संतोष किसवे पाटील ( बिलोली ), शरदचंद्र मानकरी ( उदगीर ), आमटे जे. नारायण ( किनवट ) यांनी यश मिळविले.  कथालेखन स्पर्धेत आंनद गायकवाड ( मुखेड ) तर व्दितीय प्रा.डॉ. सुधीर अग्रवाल ( वर्धा ) यांनी क्रमांक मिळविला.  काव्यगायण स्पर्धेत रुपेशकुमार मुनेश्वर ( किनवट ) तर व्दितीय किरण कदम चव्हाण ( नायगाव ) ह्यांनी क्रमांक मिळविला.  कला आविष्कार स्पर्धेत रेखा मनोजकुमार सुरवसे ( इंदापूर, पुणे ) ह्या प्रथम क्रमांकाचे यश मिळविले.
        परिक्षक म्हणून प्रसिध्द कवी विरभद्र मिरेवाड ( नायगाव ), प्रसिध्द साहित्यिक प्रा.डॉ. दीपक चिद्दरवार ( उदगीर ), प्रसिध्द गायक सुरेश पाटील ( किनवट ), प्रसिध्द चीत्रकार रणजीत वर्मा ( माहूर ) यांनी काम पाहिले.   सर्व विजेत्या स्पर्धेकांचे राजाध्यक्ष नटराज मोरे, जिल्हाध्यक्ष तथा राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक रमेश मुनेश्वर, उपाध्यक्ष नासा येवतीकर, सचिव मिलिंद जाधव, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक गनू जाधव, विजय वाठोरे, प्रल्हाद जोंधळे, चंद्रकांत कदम, भूमय्या इंदूरवार, भारतध्वज सर्पे आदिनी अभिनंदन केले आहे.
.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News