माहूर :
तालुक्यातील मौजे अंजनखेड येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील अध्यापक विनोद कांबळे यांना महात्मा जोतिराव फुले राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार देवून गौरविण्यात आल्याबद्दल त्यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सिंदुदूर्ग येथे शानदार सोहळ्यात त्यांचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला. अत्यंत हालाकिच्या कौटुंबिक परिस्थितीत त्यांनी एम.ए. मराठी व ईतिहास या विषयाचे शिक्षण घेवून बि.एड.ही पदवी प्राप्त केली. तसेच नातेवाईक, गुरूजन वर्ग व मित्रपरिवाराच्या सहकार्याने मराठी या विषयात 'नेट' परिक्षाही उत्तीर्ण केली. ते अंजनखेड येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मागील १३ वर्षांपासुन मराठी व इतिहास या विषयाचे अध्यापनाचे कार्य सुरू आहे. उत्कृष्ठ सुत्रसंचालक, कवी व लेखक म्हणून सुपरिचित असलेल्या विनोद कांबळे यांना अभिनय, नृत्य, एकांकिका, दिग्दर्शन अशा विविध क्षेत्रात जिल्हा, राज्यस्तरीय व विद्यापीठीय पुरस्कार प्राप्त आहेत. तसेच न्यायप्राधिकरण, ग्राहक संरक्षण संघटना, त्याचबरोबर भारतीय बौध्द महासभा अशा विविध संघटनाचे अध्यक्षपद भुषवित त्यांनी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व धार्मिक अशा विविध क्षेत्रात कार्य करून आपली ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या दैदिप्यमान कार्याबद्दल महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषद, महाराष्ट्र यांच्या वतीने त्यांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थाध्यक्षा विमलताई खराटे, सचिव ज्योतीबा खराटे, प्रा. जय खराटे, प्राचार्या जयस्वाल यांचेसह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी - गावक-यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.




No comments:
Post a Comment