राज्यपाल दत्तक जावरलासह आदिवासी गावांच्या शैक्षणिक स्थितीची डाक्युमेंटरी फिल्म चित्रिकरण चमूच्या गाडीचा भीषण अपघात ; घटनास्थळी दोन जण गंभीर जखमी : आता प्रकृती स्थिर - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, December 14, 2019

राज्यपाल दत्तक जावरलासह आदिवासी गावांच्या शैक्षणिक स्थितीची डाक्युमेंटरी फिल्म चित्रिकरण चमूच्या गाडीचा भीषण अपघात ; घटनास्थळी दोन जण गंभीर जखमी : आता प्रकृती स्थिर



 नांदेड :
 किनवट उमरखेड रोडवर कार आणि ट्रॅक्टरच्या भीषण अपघातात नांदेड येथील साहित्यिक व समग्र शिक्षाचे कार्यक्रम अधिकारी  डॉ.विलास ढवळे, समन्वयक प्रकाश गोडणारे, इंडिया टीव्ही प्रतिनिधी विलास आडे व पत्रकार बालाजी ढवळे जखमी झाले.ही घटना दिनांक 13 डिसेंबर रोजी रात्री एक वाजता घडली .


          किनवट येथील उत्तम कानिंदे ,निवेदक न्यूजचे संपादक निवेदक कानिंदे अनिल इंगोले यांच्यासह राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या किनवट तालुक्यातील जावरला या गावची व कोलाम पोड आणि सिडामखेडा येथील आदिवासींच्या  लोकजीवन, सांस्कृतिक व  शैक्षणिक स्थितीची डॉक्युमेंट्री फिल्म तयार करण्यासाठी हा चमू या परिसरात चित्रीकरणासाठी गेला होता. चित्रीकरण पूर्ण करून रात्री किनवट कडून  ढाणकीमार्गे नांदेडकडे येणाऱ्या MH-26 C -2990 या कारची उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीशी जोरदार धडक झाली. अपघात एवढा भीषण होता की कारच्या समोरील भागाचा चुराडा झाला.


  याअपघातात दोन जण गंभीर जखमी झाले. विलास ढवळे यांचे नातेवाईक उमरखेड येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगोले यांनी जखमींना घटनास्थळावरून उमरखेड येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले. तिथे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मांडण यांनी  उपचार करून पुढील उपचारासाठी अॅम्बुलन्सद्वारा नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पाठवले. शासकीय रूग्णालयात डॉ.प्रतीक साळवे व त्यांच्या सहयोगी डॉक्टरांनी  त्यांच्यावर उपचार केले.
सर्वांची प्रकृती आता ठीक आहे.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News