डॉ . बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीस विध्वंसक : विपश्यना - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, December 14, 2019

डॉ . बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीस विध्वंसक : विपश्यना



         
" बुद्धाच्या धम्माची मांडणी करतांना बुद्धाच्या सामाजिक आणि नैतिक तत्त्वज्ञानावर भर दिला जात आहे , हे लक्षात घ्यावयास पाहिजे . पण असे दिसून येते की समाधी , ध्यान आणि अभिधम्म या वरच भर दिला जात आहे . भारतीय लोकांपुढे या पद्धतीने केलेली बुद्धाची मांडणी बौद्ध धम्म प्रवर्तनाच्या दृष्टीने आपल्या ध्येयास घातकच ठरेल . ( डॉ . बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे , खंड १७ , भाग ३ , पृ . ५०८ ) . डॉ . बाबासाहेबांनी अशीच भूमिका घेऊन विपश्यना , ध्यान , समाधी या ध्यानसाधनांना बौद्ध धम्माच्या दृष्टिकोणातून सपशेल नाकारले आहे . याच अनुषंगाने अभ्यासकांचे विचार येथे देत आहोत. या बद्दल चर्चा होणे अत्यावश्यक आहे. करिता अभ्यासकांच्या मतांचे आम्ही स्वागत करतो. त्यास येथेच प्रकाशीत करण्यात येईल.
-संपादक


           विपश्यना , ध्यान , समाधी , अनापानसती या साधना सांगून बुद्धांचे मूलभूत तत्त्वज्ञान बदलून टाकण्याच्या प्रतिक्रांतीला इसवी सनाच्या पाचव्या शतकापासून सुरुवात झाली आणि ही प्रक्रिया अव्याहतपणे सुरू आहे . ही वस्तुस्थिती लक्षात घेता , इसवी सनाच्या पाचव्या शतकापासून तर डॉ . बाबासाहेबांच्या काळापर्यंत , दीड हजार वर्षे भारतात बुद्धाचे मूलभूत तत्त्वज्ञान मुळीच अस्तित्वात नव्हते . प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास लक्षात घेता डॉ . बाबासाहेब म्हणतात , " बुद्धाच्या धम्माची मांडणी करतांना बुद्धाच्या सामाजिक आणि नैतिक तत्त्वज्ञानावर भर दिला जात आहे , हे लक्षात घ्यावयास पाहिजे . पण असे दिसून येते की समाधी , ध्यान आणि अभिधम्म या वरच भर दिला जात आहे . भारतीय लोकांपुढे या पद्धतीने केलेली बुद्धाची मांडणी बौद्ध धम्म प्रवर्तनाच्या दृष्टीने आपल्या ध्येयास घातकच ठरेल . ( डॉ . बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे , खंड १७ , भाग ३ , पृ . ५०८ ) . डॉ . बाबासाहेबांनी अशीच भूमिका घेऊन विपश्यना , ध्यान , समाधी या ध्यानसाधनांना बौद्ध धम्माच्या दृष्टिकोणातून सपशेल नाकारले आहे . ( The Buddha & His Dhamma , p . 255 ) _ _ डॉ . बाबासाहेबांच्या ध्येय आणि उद्दिष्टानुसार भारत जर बौद्धमय झाला , तर ब्राह्मणी हिंदू धर्म नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही , हे हेरूनच या धर्माच्या संरक्षणार्थ ऐतिहासिक काळातील प्रतिक्रांतीचे आणि त्यातील प्रभावी शस्त्र असलेल्या विपश्यनेचे पुनरुज्जीवन सत्यनारायण गोयन्का यांनी केले आहे . ते म्हणतात ,  " मूल झिझक तो इसी बातकी थी कि यह बौद्धधर्म की साधना है । इससे प्रभावित होकर कहीं मै अपना जन्मजात हिंदूधर्म तो नही छोड दूंगा ? कहीं मै बौद्ध तो नही बन जाऊंगा ? यदि ऐसा हुआ तो घोर अनिष्ट हो जायगा ? " ( विपश्यना मासिक , दि . १७ अक्तुबर , २००५ ) २ . " बोधिसत्त्व वैशाख पूर्णिमा की रात बोधिवृक्ष के तले दृढतापूर्वक पालथी मारकर बैठ गया . . . . अंतर में जागी हुई पुरानी विपश्यना साधना के सहारे काम करते करते रात्री के अंतिम प्रहर में सारे अनुशय क्लेशों का , सुषुप्त - आश्रवों का क्षय हुआ । सम्यक सम्बोधि जागी । आश्रव - विहीन वीतराग योगी सम्यक्सम्बुद्ध बन गया । भवनेत्री टूटी । यह अंतिम भव है । अब और जन्म नही होगा । " ( जागे मंगल प्रेरणा , पृ . १७८ ) ३ . " विपश्यना धर्म वर्तमान में जीने का धर्म है । " ( तत्रैव पृ . ८८ ) ४ . " मैं समझ रहा था कि बद्धवाणी में अनेक अच्छी शिक्षाएँ विद्यमान है , तभी यह विश्व के इतने देशों में और इतनी बड़ी संख्या में लोगों द्वारा मान्य हुई है , पूज्य हुई है । परंतु इसमें जो कुछ अच्छा है , वह हमारे वैदिक ग्रंथों से ही लिया गया है । " ( विपश्यना , दि . १७ अक्तुबर , २००५ ) ५ . बुद्धाच्या धम्मचक प्रवर्तन वेळी , " उसने देखा ; विपश्यना करते - करते उन सबका निरुद्ध हो गया है । . . . . कौडिण्य धन्य हुआ । उसका गोत्र बदला । वह अनार्य से आर्य गोत्र में प्रतिष्ठित हुआ , स्रोतापन्न हुआ । " ( जागे मंगल प्रेरणा , पृ . १७९ ) ६ . " . . . . सत्यनारायण गोयन्का भारत की धर्म निरपेक्षता से सहमत नहीं है . . . . . किसी भी देश के लिए धर्म आवश्यक है , लेकिन किसी नाम का विशिष्ट धर्म नहीं होना चाहिए . . . बुद्ध ने बुद्धधर्म को नाम नहीं दिया था । उन्होंने कभी भी अपनी शिक्षा को बौद्धधर्म नही कहा था । " ( पत्र परिषद , लोकमत समाचार , नागपुर , दि . ६ अक्तुबर , २००० ) " तब प्रार्थना के बाद भी देर तक श्रीकृष्णः शरणम् की भावभीनी भावना में हृदय विमग्न बना रहता । " ( आत्मकथन पृ . ३५ ) ८ . " लेकिन भगवान कृष्ण के प्रति मेरी आस्था में रंच - मात्र भी कमी नहीं आयी । गीता का महान उपदेशक कृष्ण मेरा आराध्य बना रहा । " ( आत्मकथन , पृ . ४९ ) गोयन्काचे उपरोक्त विचार लक्षात घेता त्यांना खालील बाबी सिद्ध करावयाच्या आहेत , हेच त्यातील प्रथम दर्शनी निष्कर्षांवर सिद्ध होते .
१ . गोयन्का जन्मजात कट्टर हिंदू असल्यामुळे त्यांनी जर बौद्ध धम्म स्वीकारला तर त्यांच्यावर भयानक गंडांतर कोसळेल . २ . सिद्धार्थाला विपश्यनेतूनच बुद्धत्व प्राप्त झाले आणि त्याच्या आत्म्याची पुनर्जन्माच्या फेऱ्यातून मुक्तता झाली . ३ . विपश्यना हाच जीवनमार्ग आहे ; अर्थात बौद्धधम्म जीवनमार्ग नाही . ४ . बुद्धांनी जे तत्त्वज्ञान सांगितले ते सर्व त्यांनी गोयन्काच्या वैदिक धर्मातून अर्थात वेदांतूनच घेतले आहे . ५ . बुद्ध धम्मचक्रप्रवर्तन करीत असताना कौंडिण्य विपश्यनेतून स्रोतापन्न झाला आणि अनार्य असलेला कौंडिण्य चातुर्वर्ण्य समाज रचनेनुसार आर्य प्रतिष्ठित झाला ; अर्थात बुद्धाला चातुर्वर्ण्य समाजरचना मान्य आहे . ६ . गोयन्का कट्टर हिंदू असल्यामुळे त्यांना डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्माण करताना त्याला जो धर्मनिरपेक्षतेचा पायाभूत आधार दिला , तो अजिबात मान्य नाही , आणि लोकशाही मान्य नाही . . . ७ . बुद्धानी आपल्या तत्त्वज्ञानाच्या आधारावर प्रस्थापित केलेली , बौद्धधम्म समाजव्यवस्था । मूलतः समाजजीवनाचा मार्ग म्हणून गोयन्कास मूलत : मान्य नाही . कारण बुद्धाने तिला धर्म संकल्पनेनुसार ' धर्म ' म्हटले नाही . ८ . गोयन्काचे उपरोक्त विचार आणि त्यातील निष्कर्ष लक्षात घेता , गोयन्का श्रीकृष्णाला आपले आराध्य दैवत मानतात . ९ . गोयन्का म्हणतात , " इस विपश्यना विधिसे . . . . . रक्तचाप , हृदय - रोग , माईग्रेन , अस्थमा आदि आदि भी शनैः शनै : अपने आप जडसे उखडकर दूर होने लगते है । " ( आज का सुरेख भारत , दिसंबर , २००० ) .
            या प्रमाणे बौद्धांना त्याकडे आकर्षित करण्याकरिता त्यांनी विपश्यनेचे अवास्तविकरीत्या उदात्तीकरण केले आहे . विपश्यनेसहीत सर्व साधना करीत राहण्यामुळे आणि त्याद्वारे श्वासोच्छवास खंडित झाल्यामुळे मेंदू आणि हृदय यांना नियमित होणारा प्राणवायूचा पुरवठा नियमित होत नाही ; परिणामी अनेकांना वेडेपणा , हृदयरोग आणि अन्य रोगांचा सामना करावा लागतो , हे जागतिक स्तरावर केलेल्या अनेक सर्वेक्षणातून सिद्ध झाले आहे . यामुळे विपश्यना व इतर ध्यान साधनांच्या मागे लागल्यामुळे अनेकांचे बळी गेले , त्यांचे कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त झाले . ( कांबळे , एन . जी . बुद्धांनी विपश्यना सांगितली का ? पृ . २३१ - ४७ , ३२८ - ३१ ) , गोयन्काचे उपरोक्त विचार आणि त्या वरील प्रतिक्रिया लक्षात घेता त्यांनी मोठ्या शिताफीने बौद्ध धम्मात आत्मा , पुनर्जन्म , वेद व वैदिक धर्म , कृष्ण आणि त्याची भगवत् गीता , लोकशाही विहीन समान व्यवस्था , ईश्वर इत्यादिंचे उदात्तीकरण करून धम्मात त्यांचे स्थान असल्याचे दाखवण्याचा अश्लाघ्य प्रयत्न केला आहे . या उलट , या सबंध बाबी डॉ . बाबासाहेबांनी आपल्या ' दी बद्ध अँड हिज धम्म ' या धम्मग्रंथात सप्रमाण पूर्णत : नाकारल्या आहेत . बौद्धांवर बुद्ध आणि त्यांच्या धम्माचा असलेला प्रभाव  नष्ट करण्यासाठी त्यांना विपश्यना , ध्यान , समाधी , अनापानसती इत्यादी ध्यान साधनांच्या मार्गी लावले आणि ते भारतातून बौद्धधम्माचे उच्चाटन करण्यात आणि बौद्धांना मनुस्मृतिसंहितेनुसार गुलाम बनविण्यात यशस्वी झाले . डॉ . बाबासाहेबांची धम्माधिष्ठित क्रांती आणि प्रामुख्याने ' दी बुद्ध अँड हिज धम्म ' हा धम्म ग्रंथ यांना येनकेन प्रकारेण निष्प्रभ करणारी सत्यनारायण गोयन्का आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची प्रतिक्रांती युद्धस्तरावर संयुक्तपणे सुरू आहे . या करिता रा . स्व . संघाने दिनांक २० फेब्रुवारी , २०११ रोजी भारतीय स्तरावर ' राष्ट्रीय धम्म क्रांती महासंघ ' या नावाचा तोतया बौद्ध भिक्खूचा संघ स्थापन केला आहे . या प्रमाणे , ' डॉ . बाबासाहेबांच्या प्रेरणेने आपण बौद्धभिक्खू झालो ' असे सांगून बौद्धांची फसवणूक करणारे तोतया भिक्खू आणि आर . एस . एस . चे चीवरधारी संयुक्तपणे , डॉ . बाबासाहेबांची धम्माधिष्ठित क्रांती आणि त्यांच्या तत्त्वज्ञानासहीत त्यांचा ' दी बुद्ध अँड हिज धम्म ' हा धम्मग्रंथ यांना ; विपश्यनेसहीत अनेक ध्यानसाधनांच्या माध्यमातून निष्प्रभ करण्यासाठी आणि बौद्धांचे परत हिंदूकरण करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत . या प्रमाणे जे महार गणातील तोतया भिक्ख विपश्यना , ध्यान , समाधी , अनापानसती प्राणायाम , अभिधम्म यांचा मार्ग अनुसरणारे , या साधनांचे समर्थन व प्रचार करणारे , सत्यनारायण गोयन्का या प्रतिक्रांतिवाद्याच्या बौद्ध विध्वंसक विचाराचे समर्थन करणारे , या सर्वांचे हिंदुकरण झाले आहे . ते कोणत्याही अर्थाने बौद्ध नाहीत . उपरोक्त वस्तुस्थिती लक्षात घेता डॉ . बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने निष्ठावंत बौद्धांनी , बौद्ध विहारात ठाण मांडून बसलेल्या अशा तोतया भिक्खूना चीवर उतरविण्यास सांगून विहारांतून हाकलून लावणे , वरील प्रतिक्रांतीवाद्यांच्या प्रचाराला बळी न पडणे , उत्तम रीतीन धम्म पाळण्याचा निर्धार करणे आणि डॉ . बाबासाहेबांची  ध्येये व उद्दिष्टे यांच्यानुसार भारतीय समाजाची पुनर्रचना करण्यासाठी त्यांनी घोषित केल्यानुसार , " बौद्ध संस्कृतीचे पुनरुज्जीवन करणे व सर्व भारत बौद्ध करणे हे माझे उद्दिष्ट आहे " याला कृतार्थता आणण्यासाठी झटणे हेच आद्य कर्तव्य आहे .
         
नागपूर - प्रा . डॉ . यशवंत मनोहर , एन . जी . कांबळे , डॉ . के . एम . कांबळे , प्रा . डॉ . गौतम खु . कांबळे प्रा . डॉ . पारीश भगत , आर . जी . वासनिक ललितकुमार कांबळे , पँथर प्रकाश बन्सोड.अॅड. डॉ . संदीप नन्देश्वर , प्रमोद मून, एन . एल . नाईक , जिन्दा भगत , एस . डी . रामटेके , आयु , देवानंद वानखडे, आयु . श्रीराम बनसोड,
वर्धा - प्रा . डॉ . एम . एल . कासारे , माणिक वानखेडे, पांडुरंग राजरत्न , भाऊराव महेशकर, प्रा . डॉ . राजकुमार मून
चंद्रपूर - एस . एन , बौद्ध , राजकुमार जवादे गोंडपिपरी - उद्धव नारनवरे
मुंबई - अशोक भरणे , राजूभाऊ कदम
सांगली - प्रा . गौतमीपुत्र कांबळे
औरंगाबाद - डॉ . अशोक गायकवाड प्रा . डॉ . भगवान धांडे , प्रा . अनिल हाडगेकर
मेहकर - वाय . जी . अंभोरे
सिन्नर - दीपक गायकवाड
नाशिक - डॉ . मिलिंद तायडे
अकोला - मिलिंद सिरसाट
यवतमाळ - प्रा . डॉ . सागर जाधव ,
गुहागर - संजय गमरे ,
कल्याण - विकास शिंदे 

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News