मनुस्मृती दहन
-सूर्यकांत कांबळे,
25 डिसेंबर 1927 हा भारतीय इतिहासातील आनंदाचा दिवस कारण या दिवशी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरानी मनुस्मृती दहन केली होती. पण हा आनंदाचा दिवस पुरोगामी लोकांना सोडले तर कोणालाच माहिती नाही. हा आनंदाचा दिवस म्हणजे भारतीय स्त्रियां व पूर्वीचे शुद्र आताचे स्वतःला हिंदू म्हणून घेणारे दलित यांना बाबासाहेबांनी मनुस्मृतीच्या जोखंडातून बाहेर काढले. आणि माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून दिला. मनुस्मृती दहनाच्या अगोदर भारतातील स्त्रिया आणि शुद्र यांची परिस्थिती खूप भयानक होती. कुत्र्या मांजरांपेक्षा अतिशय खूप वाईट जीवन होते. पण डाॅ. बाबासाहेब आंबेडकरानी यांना यातून बाहेर काढून जे उपकार केले ते खूपच मोलाचे मोठे होते पण आजची स्त्री आणि आताचे दलित हे उपकार पूर्णपणे विसरून प्रस्थापितांच्या दावनिला बांधले जात आहेत स्त्रिया तर अनेक कर्मकांडा मध्ये गुरफटत चालल्या आहेत.
माझी भारतातील स्त्रियांना आणि दलितांना विनंती आहे एकदा तुम्ही मनुस्मृती वाचून बघावी आणि ते नाही जमले तर डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे क्रांती आणि प्रतिक्रांती हे पुस्तक जरूर वाचावे म्हणजे तेंव्हा कळेल आपण कोण होतो. बाबासाहेबांनी चिखलात असलेल्या कमळाला महालात आणून बसविले पण त्याची जाणीव आजच्या स्त्रियांना आणि दलितांना नाही म्हणून ते सर्व कर्मकांडावर वृत्त नवस आणि वैकल्यांच्या मागे धावत सुटले आहेत. अशा पारंपारिक दिनदर्शिकेतून यांना काल्पनिक
व्रत आणि वैकल्यांच्या नादी लावले जात आहे. पंचांग, दिनदर्शिकेवाले महाकरोडपती झाले आणि हे रोडपती तरीपण हे त्यांचाच उदोउदो करत आहेत. आपल्याच बांधवांधर अन्याय करत आहेत. पण आजच्या स्त्रियांना इतकेच सांगेन बाबासाहेब नसते तर आज तुम्ही फक्त चुल आणि मुल करत बसला असता कारण मनुस्मृतीने तुम्हाला मुले जन्माला घालण्याचे यंत्र म्हटले होते. दलित कुणाच्या तरी घरी चाकरी करत बसला असता. तेंव्हा ज्या स्त्रियांना आणि दलितांना वाटते कि आम्ही आमच्या कर्तुत्वावर आज जे काही आहोत त्यांनी एकदा इतिहासात डोकावून बघावे आणि ठरवावे आपण कोणासोबत जावे. 25 डिसेंबर 1927 नंतर ज्या वेळी या देशात संविधान लागू झाले तेंव्हा पासून मात्र या देशातील मंत्रांवर
उडणारी पुष्कक विमाने माशाच्या पोटी मनुष्याचा जन्म या भाकड कथा बंद झाल्या. आणि खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगू लागला ते फक्त आणि फक्त डाॅ. बाबासाहेब. आंबेडकर यांच्या मुळे. तेंव्हा मला वाटते मनुस्मृती दहन हा दिवस सर्वांनी खासकरून स्त्रियांनी एक राष्ट्रीय सण म्हणून साजरा करावा असे मला वाटते .
-सूर्यकांत कांबळे,
संस्थापक अध्यक्ष, स्वराज्य युवा संघटना




No comments:
Post a Comment