कुष्ठरुग्णांना सन्मान जगण्याची उमेद आणि माणूस म्हणून प्रतिष्टा मिळवून देणारे आणि त्यांच्या श्रमाला आनंदाची झळाळी देवून त्यांच्या जीवनात आनंदवन निर्माण करणारे बाबा आमटे यांची आज जयंती ...त्यांना विनम्र अभिवादन ...!!!
-यशवंत भंडारे
नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील शारदा भुवन शाळा संकुलातील एका कार्यक्रमासाठी साधारणतः 1983 मध्ये बाबा आमटे आले असता मला त्यांना जवळून पहाण्याचा , भेण्याचा योग्य आला होता ... आजारांनी जखडलेलं असतानाही त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य फुललेलं असायचं ...त्या प्रसन्न चेहऱ्यानं ते स्वागत करत बोलत असतं ...
बाबा आमटे यांच्या उच्चतम् स्वप्नांचं खरं रूप म्हणजे आनंदवन होय ... परंतु एकेकाळी
" आनंदवन म्हणजे कुष्ठकार्य " असं संबोधलं जातं होतं ...ही ओळख आता पुसटशी झाली आहे ... आता प्रत्यक्षात अंध-अपंग , कर्णबधिर , बेरोजगार, शेतकरी ,आदिवासी अशा समाजातील उपेक्षित घटकांना न्याय्य , निरीगी आणि अर्थपूर्ण आयुष्य जगण्याची संधी देणारं
" आनंदाचं घर " झालं आहे ...
सध्या आनंदवन म्हणजे आनंदानं भरलेलं गाव आहेच , त्याचबरोबर गावखेड्याच्या सर्वगीन विकासाचं जितं जागतं उदाहरण सुद्धा आहे ...
बाबा आमटे यांचं स्वप्न आनंदवनात रुजवणाऱ्या कृतिशील प्रेरणेची ही कहाणी संबंध देशाला प्रेरणा देणारी आहे ...
-यशवंत भंडारे,
माहिती उपसंचालक, लातूर





No comments:
Post a Comment