नागपूर :
बुध्दंग् सरणंग् गच्छामी...
धम्मम् सरणंग् गच्छामी...
संघग् सरणंग् गच्छामी...
आणि
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञांचे अनुसरन करून शेकडो इतर मागासवर्गीयांनी ( ओबीसी ) घेतली नागपूरात बौध्द धम्माची दीक्षा .
बुधवारी (ता. २५ ) मनुस्मृतीदहन दिवसाचे औचित्य साधून ओबीसी धम्मबांधव, सार्वजनिक धम्मदीक्षा समारोह समिती, नागपूर व सत्यशोधक ओबीसी परिषद, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने येथील वर्धा मार्गावर असलेल्या उर्वेला कॉलनी मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल इंजिनियरिंग असोसिएशन (बानाई ) सभागृहात हा धम्मदीक्षा समारंभ आयोजित करण्यात आला होता.
सकाळी ११ वाजता संविधान चौकातून धम्म रॅली काढण्यात आली. यामध्ये अनेक राज्यातील धम्मबांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते. बानाई सभागृहात रॅली आल्यावर सर्वांचे स्वागत करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या मार्गावर गेल्याने बौद्ध समाजाची गेल्या साठ वर्षात झालेली प्रगती ईतर कोणाच्याही नजरेत भरण्यासारखी आहे. नेमके हेच हेरून हनुमंतराव उपरे यांनी ओबीसी समाजात मोठी जागरूकता निर्माण केली.त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढून ओबीसींकरीता धम्मदीक्षेचे अभियान सुरू केले.
भारताच्या लोकसंख्येत ५२ टक्के ओबीसी आहेत. स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही त्यांनी हिंदू धर्माची कास सोडली नाही. त्यांच्या जीवनात कुठलाही बदल झाला नाही. त्यामुळे आता ओबीसी बांधवांमध्ये धम्मदीक्षा घेण्याचे प्रमाण वाढले आहे. बुधवारी ( दि. २५ ) दुपारी झालेल्या धम्मदीक्षा सोहळ्यातही हेच चित्र होते. बानाई सभागृह शुभ्रवस्त्र परिधान केलेल्या बांधवांनी हाऊसफूल्ल झाले होते. आत व बाहेरही मोठ्या संख्येत धम्मबांधव उपस्थित होते. धम्मदीक्षा घेण्याआधी सर्वांकडून अर्ज भरून घेण्यात आला. त्यानंतर त्यांना एक नामावली देण्यात आली. यात 'बुद्ध ' नाव असलेली यादी देण्यात आली.
त्यांच्या आवडीनुसार त्यांना नामबदलही करण्याची संधी देण्यात आली. काहींनी करूणानायके याप्रकारचे नावही धारण केले. भूमिपूक्ष नागवंशी शाक्य व इतरांनी धम्मदीक्षा घेणाऱ्यांकडून त्रिशरण पंचशील म्हणून घेतले. त्यांना धर्मांतर झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले.
यावेळी त्यांना बोधीवृक्ष, बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ,ओबीसी धम्मविशेषांक, ओबीसी धम्मदीक्षा कॅलेंडर तसेच पंचशील दुपट्टा देण्यात आला.मुंबई, गोंदिया, नवी दिल्ली, राजनांदगाव, गुजरात, राजस्थान येथील ओबीसी बांधवांनी हजेरी लावली होती. यासोबतच फ्रान्स येथून आलेल्या एका व्यक्तीनेही समारोहाला हजेरी लावत धमदीक्ष घेतली. भीकरीयाडीपुत्र डॉ. रमेशभीया राठोड हे सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांनीच या धम्मदीक्षा सोहळयाची माहिती दिली. सूत्रसंचालन करून आभारही त्यांनीच मानले. विचारपीठावर उल्हास राठोड, अरविंद माळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.




No comments:
Post a Comment