महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तंत्र शिक्षण मार्गदर्शन मेळावा संपन्न - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, December 20, 2019

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तंत्र शिक्षण मार्गदर्शन मेळावा संपन्न



किनवट :
गोकुंदा येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तंत्र शिक्षण मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला. शासकीय तंत्रनिकेतन नांदेडचे उपप्राचार्य तथा स्थापत्य विभाग प्रमुख प्रकाश डी. पोपळे, प्रा. एल. टी. जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
             यावेळी उपप्राचार्य  पोपळे यांनी इयत्ता दहावी नंतर शासकीय तंत्रनिकेतन मध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध पदविका अभ्यासक्रम असुन त्यासाठी असणारी प्रवेश प्रक्रिया, एकुण जागा, लागणारी फीस, इतर सोयी सुविधा-अभ्यास करण्यासाठी अभ्यासिका, निवास व्यवस्था, शिष्यवृत्ती इत्यादी बाबतीत सविस्तर मार्गदर्शन केले. पर्यवेक्षक शेख हैदर यांनी प्रास्ताविक केले.  महेंद्र नरवाडे यांनी सुत्रसंचालन केले. इयत्ता दहावी च्या ३५० विद्यार्थ्यांनी मार्गदर्शनाचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी इयत्ता दहावी चे सर्व वर्ग शिक्षक प्रशांत डवरे, मुकुंद मुनेश्वर, प्रज्ञा पाटील, राजकुमार दवणे, सागर बोलेनवार, तुळशीराम वाडगुरे, गौतम दामोदर, सुभाष सुर्यवंशी व पर्यवेक्षक किशोर डांगे यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News