राष्ट्रसंत गाडगेबाबा स्‍मृती दिनानिमित्त भाषण आणि गायन स्पर्धांचे आयोजन विजयमाला वाठोरे यांच्या 'नास्तिक' पुस्तकाचे प्रकाशन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, December 13, 2019

राष्ट्रसंत गाडगेबाबा स्‍मृती दिनानिमित्त भाषण आणि गायन स्पर्धांचे आयोजन विजयमाला वाठोरे यांच्या 'नास्तिक' पुस्तकाचे प्रकाशन





नांदेड:
राष्ट्रसंत गाडगेबाबांचा परिनिर्वाण दिन आणि काशीनाथ वाठोरे यांच्या सहाव्या स्मृतीदिनानिमित्त दि २० डिसेंबर रोजी नांदेड येथील आंबानगर येथे भाषण स्पर्धा आणि गीत गायन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. याच वेळी विजयमाला वाठोरे यांच्या नास्तिक या पुस्तकाचे योवेळी प्रकाशन होणार आहे. अशी माहिती संयोजक डॉ सुनील गोखले यांनी दिली आहे.

      नांदेड शहरातील विमानतळ परीसरातील आंबानगर येथे हा कार्यक्रम सायंकाळी पाच वाजता होणार आहे. स्पर्धेसाठी स्पर्धकांचे दोन गट केले आहेत. भाषण स्पर्धेसाठी नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा छोटा गट. या छोट्यागटासाठी "आपले महापुरुष" असा विषय आहे. नववीच्या पुढील वर्गासाठी मोठ्या गटासाठी भाषण स्पर्धेसाठी "भारतीय संविधान" असा विषय आहे. गीतगायन स्पर्धा ही सर्वांसाठी खुली असून यासाठी "बहुजन महापुरुष किंवा सामाजिक गीतरचना" असा विषय आहे.

      भाषण स्पर्धा ही फक्त विद्यार्थ्यांसाठी असून छोट्या गटासाठी वेळ तीन मिनिटांचा वेळ असून मोठ्या गटासाठी पाच मिळनिटांचा वेळ असेल. गीतगायन स्पर्धा सर्वांसाठी खुली असून एका स्पर्धकाला एकच गीत गाता येईल. स्पर्धेसाठी प्रवेश फी नसून   बक्षीस वितरण लगेच केले जाईल. विजेत्यांना ट्रॉफी, भारतीय संविधान ग्रंथ, नास्तिक पुस्तक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम १००० रुपये, ७०० रुपये आणि ५०० रुपये देऊन सन्मानित केले जाईल.

या स्पर्धेसाठी कवी गायक श्रीपती ढोले आणि लेखक समीक्षक प्रा डॉ राजेंद्र गोणारकर हे परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत.

      याच कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात विजयमाला वाठोरे यांच्या 'नास्तिक' या पुस्तकाचे प्रकाशन हिराबाई वाठोरे आणि सरस्वतीबाई गोखले यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला डॉ भारत वाठोरे, प्रो डॉ भास्कर दवणे, डॉ एस पी गोखले, पंजाब रणवीर, संजू गोखले, पुंडलिक सोनूले, डॉ माणिक साळवे, मिलिंद व्यवहारे, डॉ नंदलाल लोकडे , यशवंत थोरात, राजकुमार कवडे, शिवाजीराव माने आणि राहुल एंगडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

स्पर्धकांसह सर्वांनी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News