डॉ.बाबासाहेब आंबेडकर व "बाबा तुम्ही पृथ्वीवर पुन्हा जन्म घ्यावा" -सूरज पी. दहागावकर - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, December 5, 2019

डॉ.बाबासाहेब आंबेडकर व "बाबा तुम्ही पृथ्वीवर पुन्हा जन्म घ्यावा" -सूरज पी. दहागावकर



कविता 1

"डॉ.बाबासाहेब आंबेडकर"


महान ज्ञानपंडित तुम्ही विश्वाचे
हालअपेष्टाही सहन केल्या तुम्ही
माणूस म्हणून अधिकार दिला
नतमस्तक तुमच्यापुढे होतो आम्ही..

वणवा पेटविला तुम्ही विचारांचा
डॉ.समस्त मानवजातीचे झाले
बांधुनी समतेच्या धाग्यात आम्हा
बाबा तुम्ही शिल्पकार घटनेचे झाले..

साक्षात बुद्धिवंत होता तुम्ही
हेवा वाटतो तुमच्या ज्ञानाचा
बंधुत्वाची आम्हा शिकवण देऊन
आदर्श दिला जीवन जगण्याचा..

बेधडक विचार व्यक्त करतांना
डगमगले नाही कधी कुणाला
कष्ट सोसुनी संविधान लिहले
रक्षणासाठी हक्क दिले आम्हाला...!!

सुरज पी. दहागावकर.
चंद्रपूर.
मो.न.8698615848

कविता 2


"बाबा तुम्ही पृथ्वीवर पुन्हा जन्म घ्यावा"



भीम विचारांचा दिवा प्रज्वलित व्हावा 
बाबा तुम्ही पृथ्वीवर पुन्हा जन्म घ्यावा 

भिमाईच्या पोटी झाला जरी जन्म तुमचा 
जन्माने तुमच्या झाला उद्धार अमुचा 
बुद्धित्वाच्या कर्तुत्वाने अंधार दूर झाला 
गावाच्या बाहेरचा आज माणसात आला... 

गर्जना हि धर्मातराची येवल्यात केली 
विविध धर्माचे ग्रंथ सखोल अभ्यासली 
चंद्रमनी भिक्खुकडूनी धम्म स्वीकारला 
विज्ञानवादी धम्माचा मार्ग दाखविला..

मानवासाठी संविधानात कायदे आहेत योग्य
संविधानामुळे बहुजनांचे उजळले भाग्य
शिक्षित झाली जनता रंजली गांजली
महापरिनिर्वाण दिनी हीच श्रद्धांजली...!!

सुरज पी. दहागावकर.
चंद्रपूर
मो.न.8698615848

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News