हैद्राबाद ' दिशा ' बलात्कार प्रकरणातील चार आरोपी पोलिस एन्काऊंटरमध्ये ठार - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, December 6, 2019

हैद्राबाद ' दिशा ' बलात्कार प्रकरणातील चार आरोपी पोलिस एन्काऊंटरमध्ये ठार


हैद्राबाद :
हैदराबाद ' दिशा ' बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार झाले आहेत. अधिक तपासासाठी घटनास्थळी नेत असताना त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांकडून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न झाला. परंतु ते आणखी जोरात पळत सुटले होते. त्यावेळी पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला.
        अधिक तपासासाठी पोलिसांनी चारही आरोपींना घटनास्थळी नेलं होतं. त्यावेळी या आरोपींनी त्या ठिकाणाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडून त्यांना थांबवण्याचा प्रयत्नही करण्यात आला. परंतु ते न थांबल्यानं पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला. आज शुक्रवारी ( ता. सहा ) पहाटे तीन वाजता ही घटना घडली. अशी माहिती हैदराबाद पोलिसांकडून देण्यात आली.दरम्यान, एनकाऊंटरची घटना ऐकून आपल्याला धक्का बसला. परंतु आरोपींना शासन मिळाल्याचा आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया पीडितीच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली.

या घटना घडल्यानंतर संपूर्ण देशातच संतापाची लाट उसळली होती. प्रत्येक बलात्काराच्या आरोपीला अशी शिक्षा होणं गरजेचं आहे. फाशीच्या शिक्षेला बराच कालावधी लागला असता. हे आरोपी ठार झाले आहेत. खऱ्या अर्थानं पीडितेला न्याय मिळाला. ते सुटले असते तर त्यांनी पुन्हा काही वाईट कृत्य केलं असतं. ही खऱ्या अर्थानं पीडितेला श्रद्धांजली आहे. या आरोपींना फाशीची  शिक्षा व्हावी अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री यांच्याकडे  केली होती. त्यांना तातडीनं शिक्षा होणं गरजेच होतं. आरोपी पळून गेले असते तर पुन्हा अशी घटना घडली असती, असं मत सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News