परभणी :
दैनिक 'गोदातीर समाचार'चे माजी संपादक डॉ. रवींद्र रसाळ यांचे रविवारी दि. 8 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास ह्रदयविकाराने परभणी येथे निधन झाले. ते पंचाहत्तर वर्षांचे होते.
दै. गोदातीर समाचारच्या स्थापनेनंतरच्या
काळापासून दे. गोदातीर समाचारचा विस्तार करणे, सायकलवरून फिरून बातम्या गोळा करणे, खेडोपाडी वार्ताहर तयार करणे, त्यांच्यासाठी प्रशिक्षण शिबिरे घेणे, वार्ताहरांच्या बातम्यांवर संपादकीय संस्कार करणे, बातम्यांचे प्रूफ तपासणे, वर्तमानपत्रांचे गठ्ठे बांधणे, एसटीला गावोगावचे पार्सल टाकणे अशी कामेही त्यांनी केली. तसेच ते एक तत्त्वचिंतक संपादक होते. कुठल्याही विषयाच्या मुळापर्यंत जाऊनच ते लिहीत. विज्ञान हा त्यांचा आवडीचा विषय होता. भूकंपावरही त्यांचे संशोधन होते. कश्मीर प्रश्नावर त्यांनी कितीतरी संपादकीय लेख लिहिले व उपायही सुचविले होते. मराठवाड्यातील साहित्यिक पिढी घडविण्यातही त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांची स्वतःची सात-आठ पुस्तके प्रकाशित आहेत. या डिसेंबरमध्ये शेवटच्या आठवड्यात त्यांच्या पंचाहत्तरव्या वाढदिवसाचा सोहळाही आयोजित करण्याची परभणी येथे तयारी चालू होती परंतु तत्पूर्वीच या जगातून ते कायमचे निघून गेले.
त्यांना भावपूर्ण आदरांजली!
त्यांच्या पार्थीवावर सोमवार, वि.9 डिसेंबर रोजी सकाळी 10 वा.परभणी येथील वैकुंठधाम स्मशानभूमित अत्यंसंस्कार करण्यात येणार आहे.
रविंद्र रसाळ यांचा जन्म 22 नोव्हेबर 1945 रोजी झाला होता. दै.गोदातीर समाचारचे 1972 ते 1981 या कालावधीत कार्यकारी संपादक म्हणून त्यांनी काम पाहीले, मराठी (ग्रामीण) पत्रकारितेतील डॉक्टरेक्ट मिळवणारे ते पहिले संपादक होते. एमएससी पदार्थ शास्त्र पदवी त्यांनी संपादन केली होती. बी.जे. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केले होते. महाराष्ट्र शासनाचे जाहीरात विषयक धोरण याबद्दल जिचकर समितीसमोर त्यांनी निवेदन सादर केले होते. अधिस्वीकृती समितीचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले होते. त्यांच्या वयाला 75 वर्षे पूर्ण झाल्यामुळे येत्या 29 डिसेंबर रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या कार्यक्रमाची तयारी सुरु असतांनाच त्यांचे निधन झाल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी हेमा रसाळ, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

No comments:
Post a Comment