संकुल कमठालाची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद लोणी येथे उत्साहात संपन्न - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, December 8, 2019

संकुल कमठालाची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद लोणी येथे उत्साहात संपन्न



किनवट : 
जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा कमठाला संकुलाची केंद्रीय शिक्षण परिषद लोणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकतीच उत्साहात संपन्न झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी शिक्षणविस्तार अधिकारी शिवाजी दि.खुडे होते ; तर प्रमुख पाहूणे म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदीप गुंजकर, केंद्रिय मुख्याध्यापक शरद कुरुंदकर,अंकुश राऊत, गटसमन्वयक संजय कांबळे व विषयतज्ज्ञ दयाल मोगरकर उपस्थित होते.
       प्रारंभी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गायल्यानंतर प्रस्तुत शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक रमेश मुनेश्वर यांचा लोणी शाळेच्या वतीने व केंद्राच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात केंद्रातून बदली झालेले शिक्षक रमेश पवार, उमेश डाखोरे, सुमेध भवरे, सत्यभामा भगत व उर्मिला परभणकर ह्यांना निरोप  देण्यात आला. केंद्रात बदलीने नविन आलेले शिक्षक विद्या श्रीमेवार, राजू भगत, बाबासाहेब आढाव यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी निरोप मुर्तीनी आपले मनोगत व्यक्त केले.
       दुसऱ्या सत्रामध्ये सिआरजी सदस्य राजेश मोरताडे यांनी समाजशास्त्र विषयावर सखोल मार्गदर्शन केले. प्रभारी शि. वि. अ. तथा केंद्रप्रमुख शिवाजी दि.खुडे यांनी प्रशासकिय सुचना दिल्या. लोणी शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका शाहिन गुलाबबेग यांनी सूत्रसंचालन  तंत्रस्नेही शिक्षिका विद्या श्रीमेवार यांनी आभार मानले.
        कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. यावेळी राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षका शालिनी सेलुकर, प्रितम पाटील, धनरेखा सांगवीकर, अनुसया वाकोडे, प्रेमिला जाधव, सुनिता गरड, परमेश्वर महामुने, देविदास वंजारे, राजेश गोलकोंडावार, प्रशांत शेरे, वाढे, मडावी आदी केंद्रातंर्गत शिक्षक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News