कारंजा :
भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी शुक्रवारी (ता. सहा ) सकाळी 9 वाजता स्थानिक डाँ.आंबेडकर चौक येथे डाँ.बाबासाहेब आंबेडकर अभिवादन रॅली समितीने रॅलीचे आयोजन केले होते ;परंतु प्रशासनाने रॅलीस परवानगी नाकारल्यामुळे शहरभर रॅली न काढता जागेवरच कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
सर्वप्रथम प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदना घेण्यात आली. अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला सर्व समाजातील युवकांची लक्षणीय उपस्थिति होती. संविधानाच्या समर्थनात घोषणाबाजी करून कार्यक्रम साजरा करण्यात आला.
यावेळी अभिवादन रॅली समितिचे अध्यक्ष सचिन खांडेकर, उपाध्यक्ष महादेव ठोंबरे, सचिव किशोर उके, लकी डेंडूळे, अँड.मिलिंद खंडारे, सिद्धार्थ वाकोडे, बंटी बोरकर, सतिष गुळदे, मिलिंद गवई, अँड.पंकज सावळे, संतोष कांबळे निखिल सोनोने, अक्षय भगत, कुंदन तायडे, सुर्यकांत लांडगे, निलेश लोणारे, पवन मेश्राम, लखन बागडे, इत्यादी उपस्थित होते.




No comments:
Post a Comment