कवी रमेश मुनेश्वर याची कविता ' आमची प्रतिभा ' वर झळकली - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, December 2, 2019

कवी रमेश मुनेश्वर याची कविता ' आमची प्रतिभा ' वर झळकली



नांदेड : 
जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून आणि सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकासह इतर विभागातील साहित्य प्रतिभा असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी ' आमची प्रतिभा ' हा खुला काव्यमंच उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यात किनवट येथील राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त कवी रमेश मुनेश्वर यांच्या कवितेचा समावेश करण्यात आला आहे.

' निसर्ग शिकवी आम्हा
जगावे दुसऱ्यासाठी
आपणही असेच जगावे
माणूस माणसासाठी...
आकाशी सूर्य चंद्र तारे
कसे बघा शोभती
अस्तिव असावे आपले
वेगळे वसुंधरेवरती... '

     अशी आठ ओळींची 'निसर्गशाळा' नावाची निसर्गाची महती सांगणारी रमेश मुनेश्वर  यांची कविता 'आमची प्रतिभा' या फलकावर झळकली आहे. दररोज एका कर्मचाऱ्याच्या प्रतिभेला संधी मिळत असुन अनेक प्रतिभावांत उजेडात येत आहेत. दर्जेदार कविता जिल्हा परिषदेच्या अभ्यागतांना व काव्यरसिकांना वाचावयास मिळत आहेत.

      रमेश मुनेश्वर यांच्या कवितेचा समावेश झाल्याबद्दल नांदेडचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, किनवटचे गटशिक्षणाधिकारी सुभाष पवने, शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक शिवा कांबळे, सुनिल अलुरकर, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक डॉ. हेमंत कार्ले, डॉ.शेख एम.डब्ल्यू.एच, ग.नू. जाधव, स्तंभलेखक उत्तम कानिंदे, विलास ढवळे, गंगाधर ढवळे, विलास कोळनूरकर, नागोराव येवतीकर, मिलिंद जाधव, राजेश जेठेवाड, शेषेराव पाटील, चंद्रकांत कदम आदिंनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

1 comment:

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News