मुलींमध्‍ये आत्‍मविश्‍वास निर्माण करण्‍यासाठी स्‍मार्ट गर्ल प्रशिक्षण महत्‍वाचे -जिल्‍हा परिषद सदस्‍या तथा सामाजिक कार्यकर्त्‍या प्रणिताताई देवरे-चिखलीकर - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, December 2, 2019

मुलींमध्‍ये आत्‍मविश्‍वास निर्माण करण्‍यासाठी स्‍मार्ट गर्ल प्रशिक्षण महत्‍वाचे -जिल्‍हा परिषद सदस्‍या तथा सामाजिक कार्यकर्त्‍या प्रणिताताई देवरे-चिखलीकर




नांदेड :
 मुलींमध्‍ये आत्‍मविश्‍वास निर्माण करण्‍यासाठी स्‍मार्ट गर्ल प्रशिक्षण महत्‍वाचे असून या प्रशिक्षणातून मुलींनी सक्षम व्‍हावे असे आवाहन जिल्‍हा परिषद सदस्‍या तथा सामाजिक कार्यकर्त्‍या प्रणिताताई देवरे-चिखलीकर यांनी केले. 
              लोहा तालुक्‍यातील वडेपूरी येथील जिल्‍हा परिषद हायस्‍कुल येथे सोमवार दिनांक 2 डिसेंबर रोजी स्‍मार्ट गर्ल प्रशिक्षणाचे अयोजन करण्‍यात आले होते, त्‍यावेळी त्‍या बोलत होत्‍या.

      या कार्यक्रमाला शिवाजी पाटील दळवे, गट शिक्षणाधिकारी रविंद्र सोनटक्‍के, लोहा पंचायत समितीचे माजी उपसभापती लक्ष्‍मण बोडके, राजू पाटील दळवे, प्रल्‍हाद बोडके, उत्‍तम राऊत, चांदू दळवे, सुरेखा अंभुरे, जिल्‍हा पाणी व स्‍वच्‍छता मिशन कक्षाचे जिल्‍हा कार्यक्रम व्‍यवस्‍थापक मिलिंद व्‍यवहारे, स्‍वच्‍छता तज्ञ विशाल कदम आदींची उपस्थिती होती.


     पुढे त्‍या म्‍हणाल्‍या, मुलींनी शिक्षणासोबत विविध स्‍पर्धेत सहभागी व्‍हावे. स्‍पर्धेत यश जरी मिळाले नसले तरी सहभागाने आपला आत्‍मविश्‍वास वाढतो. तसेच शाळेत मुलींना बोलते करण्‍याची गरज आहे. त्‍यांना सर्वार्थाने सक्षम केले पाहिजे. त्‍यासाठी नवनवीन उपक्रम. कराटे प्रशिक्षण, योगा, विविध खेळ, वाचन, योग्‍य अहार, योगा महत्‍वाचे आहे. पालक-विद्यार्थींनी मेळाव्‍यातून संवादावर भर द्यावा. स्‍मार्ट गर्ल प्रशिक्षणातून मुलींना निर्भय वातावरणाची जाणीव होऊन त्‍यांच्‍यात धाडस निर्माण होईल असे मत जिल्‍हा परि‍षद सदस्‍या प्रणिताताई देवरे-चिखलीकर यांनी यावेळी व्‍यक्‍त केले.

    क्रांतीज्‍योती सावित्रीबाई फुले यांच्‍या प्रतिमेचे पुजन करुन कार्यकमाची सुरुवात करण्‍यात आली. त्‍यानंतर उपस्थितांचा पुष्‍पहार व पुस्‍तक देवून सत्‍कार करण्‍यात आला. याप्रसंगी या शाळेची विद्यर्थींनी सुरेखा सदाशिव अंभुरे ही दिल्‍ली येथे आय.आय.टी.चे शिक्षण घेत आहे. या विद्यार्थींनीला या कार्यक्रमात निमंत्रित करण्‍यात आले होते. सुरेखा हिने यावेळी विद्यार्थींनीशी संवाद साधला. ती म्‍हणाली, शाळेत जे शिकतात, ते लक्षपूर्व ग्रहन केल्‍यास पुढील शिक्षणात त्‍याचा फायदा होतो. आपल्‍याला प्रत्‍येक गोस्‍टीत स्‍मार्ट बनायचे असेल तर मेहनत करावी लागेल. आपण मोठे होण्‍याचे स्‍पप्‍न पाहून चालणार नाही तर त्‍या दिशेने आपली वाटचाल असावी लागते. काय योग्‍य व काय वाईट हे आपण ओळखून आत्‍मविश्‍वासाने प्रत्‍येक पाऊल टाकल्‍यास आपल्‍यावर सा-यांचा विश्‍वास बसेल.   


              गट शिक्षणाधिकारी रविंद्र सोनटक्‍के यांनी कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक केले. लोहा तालुक्‍यात 40 शाळांमधून स्‍मार्ट गर्लचे प्रशिक्षण देण्‍यात येत आहे. यासाठी प्रत्‍येक शाळेतून दोन महिला शिक्षकांना प्रशिक्षित करण्‍यात आले. दोन दिवसाच्‍या प्रशिक्षणातून मुलींची स्‍वंयसिध्‍दा म्‍हणून ओळख होणार असल्‍याचे ते म्‍हणाले. यावेळी हॅपी थॉस्‍टसच्‍या वतीने सर्व विद्यार्थ्‍यांना पुस्‍तकाचे वाटप करण्‍यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुख्‍याध्‍यापक बी.व्‍ही. काळेवाड यांनी केले तर उपस्थितांचे आभार एन.टी. पळनाटे यांनी मानले. या कार्यक्रमाला प्रशिक्षक वळसे मॅडम, मुदखेडे मॅडम, व्‍ही.व्‍ही. चव्‍हाण, यू.पी. भातांगळीकर, माधव घोरबांड, ए.एल. भराती, जी.बी. नुकलवार, एस.जी. देशमुख, एस.जी. कु-हाळे, व्‍ही.बी. कुलकर्णी, एस. आर. नागरगोजे, एल.एल. कल्‍याणकर, डी. व्‍ही. गिरी,शिक्षक, शिक्षेकेत्‍तर कर्मचारी, पालक, विद्यार्थी व ग्रामस्‍थ यांची उपस्थिती होती

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News