किनवट :
एन. सी. ई. अार. टी. तर्फे आयोजित केलेल्या विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षेत महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गोकुंदा येथील इयत्ता ११ वी विज्ञान शाखेचे तीन व इयत्ता नववी (सेमी ) तीन असे सहा विद्यार्थ्यांनी नांदेड जिल्ह्यातु प्रथम, द्वितीय व तृतिय रँक पटकावला ; तर संयम नरेंद्र कानिंदे याची राज्य स्तरीय कॅपसाठी महाराष्ट्रातुन निवड झाली आहे.
संपूर्ण देश पातळीवर एन. सी. ई. अार. टी. तर्फे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान प्रचार, प्रसार, जागृती, उत्सुकता अाणि अावड निर्माण करण्यासाठी वरील परीक्षा घेण्यात येते. सदर परीक्षेत कनिष्ठ महाविद्यालयातील १) प्रथम प्रसुक प्रशांत दुरुगकर , २) द्वितीय-अाशिष जीवन शेंद्रे, ३) तृतिय- विरेंद्र लक्ष्मण चव्हाण व माध्यमिक विद्यालयातून १) प्रथम- संयम नरेंद्र कानिंदे, २) द्वितीय-अोमकार किशोर डांगे, ३) तृतिय- कु. श्रावणी मनोज भोयर असे रॅंक प्राप्त केले. विशेष म्हणजे संयम कानिंदे याची महाराष्ट्रातील २० विद्यार्थ्यांमध्ये राज्य स्तरीय कॅंपसाठी निवड झाली अाहे. यशस्वी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी प्रा. संजय ढाले, प्रा. रघुनाथ इंगळे,अंबादास जुनगरे, मनोज भोयर, प्रज्ञा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. यशवंत विद्यार्थ्यांचे संस्था सचिव अभियंता प्रशांत ठमके, कोषाध्यक्षा प्राचार्या शुभांगी ठमके, प्राचार्य राजाराम वाघमारे, उपप्राचार्य सुभाष राऊत, उप मुख्याध्यापक जुम्माखान पठाण, पर्यवेक्षक शेख हैदर, महेंद्र नरवाडे, किशोर डांगे,प्रा.संतोष बैसठाकुर यांच्या सह सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.




No comments:
Post a Comment