राज्यघटनेतील संधीची व दर्जाची समानता अंगिकारून दिव्यांगांचा शाश्वत विकास करणे शिक्षक - पालकांची जबाबदारी -दिवाणी न्यायाधीश जहांगीर पठाण यांचे जागतीक दिव्यांग दिन कार्यक्रमात प्रतिपादन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, December 3, 2019

राज्यघटनेतील संधीची व दर्जाची समानता अंगिकारून दिव्यांगांचा शाश्वत विकास करणे शिक्षक - पालकांची जबाबदारी -दिवाणी न्यायाधीश जहांगीर पठाण यांचे जागतीक दिव्यांग दिन कार्यक्रमात प्रतिपादन



किनवट  :
राज्यघटनेनं प्रत्येकाला दिलेली संधीची व दर्जाची समानता अंगिकारून कमकुवत घटकात मोडणाऱ्या दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार विविध योजना राबविते. त्यांच्यातील विकसनशील क्षमता ओळखून त्यांचा शाश्वत विकास करणे शिक्षक - पालकांची जबाबदारी आहे. असे प्रतिपादन दिवाणी न्यायाधीश जहांगीर पठाण यांनी केले.
             तालुका विधी सेवा समिती, तालुका किनवटच्या वतीने मंगळवारी ( ता. तीन ) निवासी मुकबधीर विद्यालयात ' जागतिक दिव्यांग दिन ' साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
             उप मुख्याध्यापक रमेश आमटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी सहदिवाणी न्यायाधीश जे.एन. जाधव, वकील संघाचे उपाध्यक्ष ऍड. मिलिंद सर्पे, सचिव ऍड. दिलीप काळे, सहसचिव ऍड. राहूल सोनकांबळे, विधी सेवा समितीचे सदस्य के. मूर्ती, ऍड. शामिले हे प्रमुख अतिथी उपस्थित होते.
              पुढे बोलताना तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश जहांगीर पठाण असे म्हणाले की, 'दिव्यांगाचा हक्क कायदा २०१६ ' हा ऍट्रॉसिटी अॅक्ट प्रमाणे त्यांची कवचकुंडले आहे. तेव्हा त्यांच्या वाट्याला न जाता त्यांचा सन्मान राखणं हे समाजाचं कर्तव्य आहे.

           मुख्याध्यापक महादेव वायकोळे यांनी प्रास्ताविक केले. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी अॅड. दिलीप काळे व सहदिवाणी न्यायाधीश जे.एन. जाधव यांनी मार्गदर्शन केले. चित्रकला, रांगोळी व निबंध स्पर्धेतील यशवंतांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली. परिसरात लावलेल्या वृक्षांना मान्यवरांच्या हस्ते जलदान करण्यात आले. अतिथींनी मुलांना खाऊ दिला. न्यायाधीश पठाण यांच्या हस्ते मैदानी व वैयक्तिक खेळांच्या स्पर्धांचं उद्घाटन करण्यात आलं.
            कार्यक्रमास पत्रकार संघाचे सचिव मलिक चव्हाण, दत्ता जायभाये, किरण ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निवासी मुकबधीर विद्यालयाचे शिक्षक देविदास धुर्वे, सुधीर गंगाखेडकर, शेख अन्सार, कमलकिशोर जोशी व सुसंस्कार निवासी मतीमंद विद्यालय, गोकुंद्याचे शिक्षक केशव डहाके, नारायण अमृते, संतोष बिराजदार, ललिता जाधव, न्यायालयीन अधिक्षक किशोर तिरनगरवार, एल. वाय. मिसलवार, मोहन कुलकर्णी, अनिल धोटे, शिपाई जोंधळे, शेख मकदूम, एस.डी. चव्हाण, पोलिस कर्मचारी उकंडराव राठोड व एस.डी. दोनकलवार आदिंनी परिश्रम घेतले.
             पत्रकार संघाचे नवनिर्वाचीत अध्यक्ष अनिल भंडारे यांच्या' या जन्मावर... या जगण्यावर... शतदा प्रेम करावे... ' या बहारदार गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
            स्पर्धेतील यशवंत : रांगोळी : १. निकिता संजय पांढरे, २. मोहिनी गजानन रणमले, चित्रकला स्पर्धा : अ गट -१. मोनिका संतोष जाधव, २. सुनिल हरिहास मेंडके, ब गट -१.मोहिनी गजानन रणमले, २. दमयंती कुंदन आडे, निबंध स्पर्धा : १.प्रथमेश ज्ञानेश्वर रासमवाड, २.ऋतिक राठोड
         



No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News