भीमाकोरेगाव :
एक जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे मानवंदना देण्यासाठी राज्यभरातून तसेच भिमानुयायी येत असतात. येथे येणाऱ्या भीमसैनिकांची त्यांच्या जेवण व पिण्याच्या पाण्याची सोय केली जाते. त्या ठिकाणी होणाऱ्या कचऱ्यावर कुणी लक्ष देत नाही.
आंबेडकरी युवा संघातर्फे या ठिकाणी संत गाडगेबाबा स्वछता अभियान राबविण्यात आले होते.
ता. 2 जानेवारी रोजी शूरवीरांना मानवंदना देऊन सर्व स्वयंसेवकांनी भीमा कोरेगाव विजयस्तंभ परिसर स्वच्छ केला. हे अभियान यशस्वी करण्यासाठी नांदेडचे मूळ निवासी परंतु सध्या पुण्यात वास्तव्यास असलेले आबेडकरी युवा संघाचे शिल्पकार नरवाडे ,सुनील धुतराज यांच्यासह अनेक स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment