किनवट :
राजेंद्रनगरमधील रहिवाशी तथा जिल्हा परिषद ( मुलांचे ) हायस्कूल येथील सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक मारोतराव नारायणराव ठोंबरे ( वय ७३ वर्षे ) यांचे सोमवारी ( ता. सहा ) दुपारी चार वाजता निधन झाले. त्यांचे पार्थिवावर मंगळवारी ( ता. सात ) दुपारी बारा वाजता त्यांचे मूळगावी मारेगाव ( वरचे ) ता. किनवट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
समता जि.प. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पतसंस्था म.ता. किनवटचे ते माजी चेअरमन तथा सहकारी पतपेढी शिक्षण विभाग म.जि.प. नांदेडचे ते माजी संचालक होते.
त्यांचे पश्चात पत्नी, तीन भाऊ, दोन मुलगे, एक मुलगी, नातवंडं असा मोठा परिवार असून महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, घोटी येथील शिक्षक सुनिल ठोंबरे यांचे ते वडील होत.
No comments:
Post a Comment