मोहपूर शाळेची तेलंगणात क्षेत्रभेट; दिली प्रत्यक्ष ज्ञानाची अनुभूती - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, January 16, 2020

मोहपूर शाळेची तेलंगणात क्षेत्रभेट; दिली प्रत्यक्ष ज्ञानाची अनुभूती



किनवट :
विद्यार्थाचा शैक्षणिक, सामाजीक,बोध्दीक विकासासोबतच नैर्सगिक विकास व्हावा... आपल्या राज्य सोबतच शेजारील इतर राज्य व तेथील भाषा , वेशभुषा, लोकजीवन व राहणीमान याचेसुध्दा ज्ञान मुलांना व्हावे... या ज्ञानातुन त्यांच्याच प्रगल्भता वाढावी... मी व माझे गाव यावरच मर्यादीत न राहता ... जगाला जवळुन पहाण्याची संधी मिळावी हा उद्देश ठेवुन... जि.प,कें.प्रा.शाळा मोहपुरची क्षेत्रभेट तेलंगणा राज्यात नेण्यात आली.
              शाळेतील ४० विद्यार्थी व शिक्षक  सुभाष सोनटक्के , रमेश आंधळे , जितेंद्र आमटे , गणपत किनाके , वासुदेव राजुरकर , राहुल तामगाडगे , शालेय शिक्षण समिती अध्यक्ष दिगांबरजी खुडे, मध्यान्ह भोजन स्वयंपाकी रघुनाथ बोथिंगे सहभागी झाले होते.
               तीर्थक्षेत्र बासर संस्थान... सोबतच गुहा व पहाड आहे.. या ठिकाणी मुलांना नेऊन क्षेत्राबद्दल माहिती देण्यात आली.
            त्यानंतर प्रवास सुरु झाला गोदावरी नदीवर बांधण्यात आलेले  रामधरण...खुप मोठ्या विस्तीर्ण जागेत पसरलेले  अथांग धरण ,  लक्ष जात नाही तिथ पर्यत पसरलेले पाणी, मुबलक प्रमाणात असलेला पाण्याचा साठा मुलांना आनंदीत करुन गेला... या धरणामुळे तेथे भाताची शेती खुप मोठ्या प्रमाणात करण्यात येते... धरणाविषयी विस्तृत माहीती मुलांना देण्यात आली...
क्षेत्रभेटीला जातांना अजुबाजुच्या परिसराची व गावांची माहीती मुलांना देण्यात आली...
किनवट तालुक्यातील घनदाट जंगलातुन प्रवास करतांना मुलांना खुप आनंद मिळाला...
        क्षेत्रभेट प्रवासात सर्व मुले व मुलींनी खुप आनंद घेतला... सर्वांच्या चेहर्‍यावरील आनंद पहाता क्षेत्रभेट यशस्वी झाली.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News