महिला या देशाचे भविष्य ठरवणारी शक्ती ; " माता पालक संवाद " या अनोख्या कार्यक्रमात सावित्रीच्या लेकी एकत्र आल्या अन् एकमेकिंशी बिनधास्त बोलल्या - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, January 16, 2020

महिला या देशाचे भविष्य ठरवणारी शक्ती ; " माता पालक संवाद " या अनोख्या कार्यक्रमात सावित्रीच्या लेकी एकत्र आल्या अन् एकमेकिंशी बिनधास्त बोलल्या



प्रांजली कानिंदे
किनवट :
महिलांना त्यांच्या क्षमतांची जाणीव करून वैयक्तिक स्वातंत्र्य व निर्णय घेण्याचा अधिकार मिळणे. महिला या देशाचे भविष्य ठरवणारी शक्ती आहे आणि त्यामुळे ही शक्ती सुदृढ व सक्षम बनविणे ही समाजाची जबाबदारी आहे.
आज महिला सबलीकरण करताना सर्वप्रथम समाजात महिलांचे अधिकार व मूल्य यांच्यावर घात करणाऱ्या विघातक प्रवृत्ती अर्थात हुंडा प्रथा, स्त्री भ्रूणहत्या, निरक्षरता, लैंगिक अत्याचार, असमानता इत्यादींचा नाश करणे गरजेचे आहे. यासाठी सावित्रीच्या लेकी एकत्र आल्या अन् एकमेकिंशी बिनधास्त बोलल्या. निमित्त होतं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विचार मंचच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ व सावित्रीमाई फुले जयंतीचं औचित्य साधून महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गोकुंदा येथे " माता पालक संवाद " या अनोख्या कार्यक्रमाचं.
              प्राचार्या शुभांगी ठमके अध्यक्षस्थानी होत्या. प्रमुख अतिथी म्हणून संस्था सचिव अभियंता प्रशांत ठमके, माहूरच्या नगराध्यक्षा शितल मेघराज जाधव, गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने, विस्तार अधिकारी छाया तुपेकर, प्राचार्य राजाराम वाघमारे, पालक प्रतिनिधी कविता अभंगे, केंद्रिय मुख्याध्यापक राम बुसमवार, उत्तम कानिंदे उपस्थित होते.
              प्रतिमांना पुष्पार्पूण शिक्षिकांनी महिला सक्षमीकरणाच्या विविध पैलूवर माता पालकांशी मनमोकळा संवाद साधला.

"आत्मजाणीव " या विषयावर ज्योती शेरे म्हणाल्या, 'स्वतःला स्वतःच्या गुणांची जाणीव असावी. मुलांमध्ये असलेले चांगले गुण शोधून त्यांना वाव देणे. प्रत्येक मुलगा किंवा मुलगी हे वेगळे ( स्पेशल )असतात. ही जाणीव निर्माण करून देता यावी. '


- ज्योती शेरे

" मासिक पाळी व स्वच्छता " या विषयावर संतोषी पिसारीवार व प्रज्ञा पाटील यांनी शास्त्रोक्त माहिती देऊन याबाबत असलेले समज-गैरसमज, त्या दरम्यान घ्यावयाची काळजी व स्वच्छता याविषयीची माहिती दिली.



-संतोषी पिसारीवार व प्रज्ञा पाटील

" वेशभुषा " या विषयावर वंदना पाटील म्हणाल्या, ' प्रसंगानुरूप पोषाख असावा. चांगल्या कपड्यांमुळे व्यक्तिमत्व खुलते म्हणून अंगभर कपडे कधीही चांगलेच. '

-वंदना पाटील

" निवड व निर्णय " या विषयावर प्रा.मायावती सर्पे म्हणाल्या, ' निवड ही योग्य व आत्मजाणीवेतून करायला हवी. मग ती करिअर संबंधी असो की, जोडीदार निवडी बाबत असो ;नाहीतर जीवनात अनेक धोके व संकटांना सामोरे जावे लागेल. '

-प्रा.मायावती सर्पे

" संवाद व नातेसंबंध " या विषयावर बोलतांना सारीका दारमवार व किर्तीका भंडारे म्हणाल्या, ' सध्या स्थितीत पलकांचा आपल्या पाल्यांशी निरोगी संवाद अत्यंत महत्वाचा आहे. पालक या नात्याने त्यांच्या सोबत मित्र - मैत्रिणी प्रमाणे वावर असावा. '


-सारीका दारमवार व किर्तीका भंडारे

" संरक्षण " या विषयी महिला पोलिस शिवनंदा जाधव, शिवनंदा रायलवाड, अनिता गजेलवार व ममता बागेश्वर म्हणाल्या, ' संकटकाळी जसे जमेल तसे स्वतःचं रक्षण  केले पाहिजे. मग नखांचा किंवा मिळेल त्या साधनांचा वापर करून स्वसंरक्षण करावे. '

-ममता बागेश्वर

" मीत्र व मोह " या विषयी सीमा साळवे व नंदा नगारे म्हणाल्या, ' जवळचे मित्र निवडतांना मुलांनी काळजी घ्यावी. मित्र - मैत्रिणी कोणत्या प्रकारच्या असाव्यात याबाबत मुलांना मार्गदर्शन करावे. जवळच्या मित्रांची -मैत्रिणींची स्वतः चौकशी करावी. '


-सीमा साळवे व नंदा नगारे

" मोबाईल " या विषयावर माधुरी आलोने म्हणाल्या, ' आपला मुलगा मोबाईलचा योग्य उपयोग करतो का ? याकडे लक्ष द्यावे. मुलांचा नियमीत अभ्यास घ्यावा. मुलांशी संवाद साधावा. '

-माधुरी आलोने

" मुलगा -मुलगी समानता " या विषयी प्रा.शारदा शहाणे म्हणाल्या, ' मुलगी पण मुलांसारखे क्षेत्र गाजवू शकते याची अनेक उदाहरणे आहेत. त्यासाठी केवळ आई -वडिलांचा विश्वास महत्वाचा. त्याचबरोबर ती सूरक्षित व सक्षम होण्यास तिला बालपणापासूनच धडे देणे आवश्यक. '

-प्रा.शारदा शहाणे


" संस्कार " या विषयावर या कार्यक्रमाच्या संकल्पक प्राचार्या शुभांगी ठमके म्हणाल्या, ' शिक्षणामुळेच मनुष्यत्व येते. औपचारीक शिक्षणासोबत अनौपचारीक शिक्षणाची नितांत गरज आहे. ते घरातून पालकांकडूनच मिळतं. म्हणून पालकांनी मुलांसमोर जबाबदारीनं वागलं पाहिजे. कळत नकळत चांगले वाईट संस्कार मुलांवर घरातच घडत असतात. आज बरीच मुलं - मुली चुकीचं वर्तन करतात. त्याला जबाबदार पालकही आहेत. आपल्यातील चुकीच्या वर्तणूकीचे आत्मपरिक्षण करून मातांनी सुधारून घेऊन समाजासाठी, देशासाठी जबाबदार नागरीक निर्माण करावे. ' अध्यक्षीय समारोप करतांना त्या बोलत होत्या.

-प्राचार्या शुभांगी ठमके   


 ज्योती शेरे यांनी प्रास्ताविक व सीमा साळवे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. शिल्पा गिमेकर यांनी आभार मानले. यावेळी माता पालक वर्षा गायकवाड, श्रीमती गरूडे, सुजाता नरवाडे, जोत्सना वाघमारे, आरती वाठोरे यांनीही मनोगत व्यक्त केले.

         कार्यक्रमास चित्रा कुळकर्णी, मनीषा चौधरी, रेखा कानिंदे, वर्षा गजभारे, प्रा.मोनीका गुप्ते, लता गावंडे, विद्या पाटील, महादेवी दहिफळे, वैशाली नरवाडे, कांचन कावळे, वैशाली साबळे, स्वेत पुयड, पौर्णिमा बामणे,जेबा शेख या शिक्षिकांसह बहुसंख्य माता पालक उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News