' ज्ञानदीप ' ई -विशेषांकाचे ऑनलाईन प्रकाशन "शाळा डिजिटल झाल्या, शिक्षणात तंत्रज्ञान आले, ते विद्यार्थीप्रिय झाले.." - साहित्यिक व्यंकटेश चौधरी यांचे प्रतिपादन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, January 5, 2020

' ज्ञानदीप ' ई -विशेषांकाचे ऑनलाईन प्रकाशन "शाळा डिजिटल झाल्या, शिक्षणात तंत्रज्ञान आले, ते विद्यार्थीप्रिय झाले.." - साहित्यिक व्यंकटेश चौधरी यांचे प्रतिपादन



नांदेड :
           क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त 'ज्ञानदीप' हा 'ई-विशेषांक' प्रकाशित करीत आहात, हा शिक्षण जगतातील अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या नावाला सार्थ ठरवणारा आपला उपक्रम आहे. शाळा डिजिटल झाल्या, शिक्षणात तंत्रज्ञान आले, ते विद्यार्थीप्रिय झाले. असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी केले.

         अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला मंच नांदेडच्यावतीने 'ज्ञानदीप -2O2O' ई- विशेषांकाच्या ऑनलाईन प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. सर्वप्रथम सावित्रीबाई जोतीराव फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. मान्यवरांच्या स्वागतानंतर व्यंकटेश चौधरी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी संस्थापक अध्यक्ष नटराज मोरे व जिल्हाध्यक्ष रमेश मुनेश्वर उपस्थित होते.

          पुढे बोलतांना ते म्हणाले की, या अंकाचे संपादक राज्य पुरस्कृत शिक्षक रमेश मुनेश्वर आणि कार्यकारी संपादक मिलिंद जाधव, नासा येवतीकर यांचे रचनात्मक योगदान कौतुकास्पद आहे.  आपणही या नव्या लिहित्यांना या माध्यमातून नवा विचार मंच मिळवून देण्यासाठी करीत असलेला प्रयत्न अभिनंदनीय आहे. येवढेच नाही तर नांदेड जिल्हा प्राथमिक शिक्षणात लक्षवेधी आहे असेही ते म्हणाले.

          ई- विशेषांकाचे संपादक रमेश मुनेश्वर यांनी बोलतांना म्हणाले की, विद्यार्थ्यांची प्रगती  हे शिक्षकांच्या हाती असते. शिक्षकाच्या हातून साहित्यिक  कलाकार  क्रीडापटू  घडत असताना  आणि  त्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी  झटणाऱ्या शिक्षकांमध्ये  हे सर्व गुण असतात  पण आपल्या कामाच्या व्यापात विद्यार्थ्यांना घडवणारा शिक्षक आपल्या कलागुणां पासून वंचित राहतो. म्हणून  शिक्षकांच्या  या सर्व कलागुणांना  वाव मिळावा, साहित्य, कला, क्रीडा  या  प्रकारात शिक्षकांनीही तालुका, जिल्हा, राज्य आणि देशाचे प्रतिनिधीत्व करावे हे पाहिलेले स्वप्न साकारत असताना मनाला खूप समाधान वाटते. दरवर्षी ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले जयंती निमित्त ई -विशेषांक काढल्या जाईल, शिक्षकांनी लिहीते व्हावे. असेही ते म्हणाले.
 
         अध्यक्षीय समारोप करतांना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नटराज मोरे म्हणाले की, शिक्षकांच्या साहित्य, कला, क्रीडा या गुणांना वाव देण्यासाठी  आणि  त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी स्थापन केलेल्या रोपट्याचे वृक्षात रूपांतर होत आहे. मीडियाचा वापर करून नांदेड जिल्हाध्यक्ष रमेश मुनेश्वर यांनी ई- विशेषांकाचा सोहळा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अर्पण करून मंडळाच्या वृक्षाला खऱ्या अर्थाने बहार आणला आहे. असे म्हणतात ना दिव्यात तेल असेल तरच दिवा प्रज्ज्वलित राहून इतरांना प्रकाश देऊ शकतो. नांदेड जिल्हा समूहात खूपच गुणी शिक्षक आहेत.
शिक्षकांच्या विविध कलाकृतीचे कुठेतरी संकलन व्हावे. त्यातून निखळ आनंद मिळावा. सृजनशीलतेचा विकास व्हावा. अशा विविध कल्पनेतून ई विशेषांकाचा जन्म झाला असला तरी त्याने जन्मतः सूर्याच्या दिशेने झेप घेतली आहे. तंत्रस्नेही शिक्षक मिलिंद जाधव व स्तंभलेखक नासा येवतीकर यांनी या विशेषांकासाठी घेतलेली मेहनत वाखाणण्याजोगी आहे.

         कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन नागोराव येवतीकर यांनी केले ; तर मिलिंद जाधव यांनी प्रास्ताविक करुन आभार मानले. यावेळी राज्य पुरस्कृत शिक्षक ग.नू.जाधव, जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षक गजानन पाटील, शेषेराव पाटील, कवी विरभद्र मिरेवाड, विजय वाठोरे, आनंद गायकवाड, रवी ढगे, जयसिंग फिंगरवाड, साहेबराव कांबळे, प्रा.सुधीर अग्रवाल, रणजीत वर्मा, सोनबा दवणे, महेंद्र नरवाडे, प्रल्हाद जोंधळे, चंद्रकांत कदम,  संध्याजी रायठक, अर्चना गरड, विजया तारू, वंदना मनुरे, अनिता दाणे, किरण कदम, जयश्री चव्हाण, रेश्मा शेख, उर्मीला परभणकर, भूमय्या इंदूरवार, नितीन दुगाने, कल्याण कस्तुरे, रुपेश मुनेश्वर, शेख बशीर, सुनिल धोबे, नंदकुमार ओतारी, भारतध्वज सर्पे, संतोष किसवे पाटील, शरदचंद्र मानकरी आदी ऑनलाईन उपस्थित होते.

1 comment:

  1. आमच्या उपक्रमाची आपण दखल घेतल्या बद्दल.. संपादकाचे आभार..🙏👍

    ReplyDelete

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News