मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढून रुग्णांना नवजीवन देता आलं याचा आत्मानंद -जिल्हाधिकारी अरूण डोंगरे गोकुंद्यात कर्करोग निदान शिबीर उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, January 13, 2020

मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढून रुग्णांना नवजीवन देता आलं याचा आत्मानंद -जिल्हाधिकारी अरूण डोंगरे गोकुंद्यात कर्करोग निदान शिबीर उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन




किनवट  :
आजपर्यंत नांदेड जिल्हयामध्ये 15 तालुक्यात 30 कर्करोग निदान शिबीरे घेण्यात आली.56 प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत 20,81,256 लोकसंख्या असलेल्या 4,80,529 घरांमध्ये आशा व आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत सर्वेक्षण करण्यात आले .  शिबीरामध्ये 11,081 रुग्णांची मोफत तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी करण्यात आली. त्यापैकी 1557 रुग्णांची पॅप स्मिअर टेस्ट (Pap smear Test ) घेण्यात आली. अशा एकूण 2465 रुग्णांना नांदेड येथे पुढील तपासणीसाठी संदर्भित करण्यात आले.तसेच 1297 रुग्ण ज्यांना पुढील काही काळामध्ये कर्करोग होण्याची संभावना दिसून आली. त्यांचेवर प्रतिबंधात्मक औषध उपचार करण्यात आला व आरोग्य शिक्षण देण्यात आले. या नाविण्यपूर्ण उपक्रमातून मृत्यूच्या दाढेतून रुग्णांना बाहेर काढून नवजीवन देता आलं याचा आत्मानंद आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी केले.
           जिल्हा नियोजन समिती पुरस्कृत जिल्हा कर्करोग नियंत्रण व जनजागृती प्रकल्प, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने उपजिल्हा रुग्णालय, गोकुंदा येथे आयोजित केलेल्या कर्करोग निदान शिबीराचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.  यावेळी आमदार भिमराव केराम, सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनीही मनोगत व्यक्त केले.
           प्रारंभी धन्वंतरी , राष्टूमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पार्पूण, दीपप्रज्वलन व फीत कापून मान्यवरांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन झाले. नोडल अधिकारी डॉ. गणपत वाडेकर यांनी प्रास्ताविक केले. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी आभार मानले.
          पुढे बोलतांना जिल्हाधिकारी डोंगरे म्हणाले,15 तालुक्यामध्ये तोंडाचे 23 , स्तनाचे 8 व गर्भाशयाच्या पिशवीच्या मुखाचे  11 असे एकूण 42 कर्करोग झालेले रुग्ण आढळून आले आहेत. त्यांचेवर मोनार्क कॅन्सर हॉस्पिटल येथे उपचार चालू आहेत. त्यापैकी बरेचशे रुग्ण उपचार घेऊन सध्या बरे झाले आहेत . कर्करोग नसलेल्या स्तनाच्या गाठीचे 216 रुग्ण आढळले त्यावर उपचार चालू आहेत.
            शिबीराच्या यशस्वीतेसाठी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे, गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने, डॉ. व्यंकटेश ऐटवार, डॉ. गुंटापेल्लीवार, विठ्ठल सिरमनवार, राम बुसमवार, कृष्ठरोग सहायक सुधाकर भुरे आदिंनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News