किनवट :
महिलांसाठी सुरक्षित समाज निर्माण करण्याची जबाबदारी महाविद्यालयीन तरूण - तरूणींची आहे. महिलांनी स्वतःला कमी न लेखता हिमतीने कुटुंब नोकरी व समाजात खंबीरपणे उभे राहून समाज परिवर्तनासाठी पुढे आले पाहिजे असे प्रतिपादन इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. ममता जोनपेल्लीवार यांनी केले.
येथील बळीराम पाटील महाविद्यालयात महिला तक्रार निवारण समिती व समाजशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रमाता जिजाऊ व सावित्रीमाई फुले यांच्या जयंती निमित्य "स्त्री जागर " या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी त्या बोलत होत्या. प्राचार्य डॉ. शिवराज बेंबरेकर अध्यक्षस्थानी होते. उपप्राचार्य प्रा. राजकुमार नेम्मानिवार,पर्यवेक्षक प्रा. अनिल पाटील, प्रा. डॉ. अंबादास कांबळे, प्रा. डॉ. शुभांगी दिवे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना त्या म्हणाल्या,स्त्रीमध्ये प्रचंड उर्जा व शक्ती आहे ती सदैव मुलांच्या कल्याणासाठी व विकासासाठी वापरली पाहिजे. यावेळी प्रा . संतोष पवार यांनी मनोगत व्यक्त केले . स्त्री जागर या दोन दिवसीय कार्यक्रमानिमित्य निबंध स्पर्धा वादविवाद स्पर्धा , रांगोळी स्पर्धा , पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . वादविवाद स्पर्धेमध्ये साईरोज सलिम सुदामनिया , भाग्यश्री राठोड , आरती राठोड , रांगोळी स्पर्धेमध्ये वैष्णवी रूद्रावार, ऐश्वर्या धात्रक , निबंध स्पर्धेत शोभा हूरदुके , तहरीम खानम , आरती राठोड या विद्यार्थिनींनी अनुक्रमे प्रथम , व्दितीय व तृतीय पारितोषीक प्राप्त केले. परिक्षक म्हणून प्रा. उमाकांत इंगोले , प्रा. डॉ. रत्ना कोमावार, प्रा. डॉ. गजानन वानखेडे आदिनीं काम पाहिले.
कार्यक्रमाच्या यशस्वी लेसाठी प्रा. मंदाकिनी राठोड, प्रा. अम्रपाली हटकर, प्रा. डॉ. लता पेंडलवाड, प्रा. डॉ. विजया खामकर, आशा सिरपुरकर, प्रा. श्रुती सुरवसे, प्रा. शिल्पा सर्पे, प्रा. शेख समरीन, लक्ष्मीबाई पुट्टावार आदिनी परिश्रम केले. प्रा. डॉ. प्रज्ञा घोडवाडीकर यांनी सूत्रसंचाली केले. प्रा. सुलोचना जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमास बहूसंखेनं विद्यार्थी व विद्यार्थींनी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment