बिनडोक तरूणाईसाठी व्हलेन्टाईन डे ' स्पेशल ' प्रा.नंदू वानखडे ' यांची कविता -संपादक
तू तिला आवडत नाही
तरीही तुझी का जबरदस्ती
बेकार बापाच्या टुकार पोरा..
एवढी कशी रे तुझ्यात मस्ती...?
मोबाईलवरच्या माकडतोंड्या
खिशात वाळेना शेंबडी दस्ती
तुझ्या आईची अन् बहिणीची
जिंदगी आहे का एवढी सस्ती...?
पराकोटीच्या नराधमा रे !
असं ते प्रेम असते का..
जाळून मारून तिला टाकतो
जीव तिला रे नसते का...?
हिर रांझा ,लैला मजनू च्या
कसोटीत ते बसते का..
तुझ्या दिमाखात त्या पोरीचे
जिवन इतके सस्ते का...?
रोज बातमी पेपरामधली
मन सुन्न करून टाकते रे..
बिनडोकपणे ही तरूणाई
अशी बरे का वागते रे....?
-प्रा.नंदू वानखडे ,
मुंगळा जि.वाशिम
9423650468




No comments:
Post a Comment