जिल्‍हयात शिष्‍यवृत्‍ती परीक्षा सुरळीत; सिईओ अशोक काकडे यांची परीक्षा केंद्राला भेट - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, February 17, 2020

जिल्‍हयात शिष्‍यवृत्‍ती परीक्षा सुरळीत; सिईओ अशोक काकडे यांची परीक्षा केंद्राला भेट



नांदेड, ता.16 फेब्रुवारी 2020 :
इयत्‍ता पाचवी व इयत्‍ता आठवीसाठी रविवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी जिल्‍हयात घेण्‍यात आलेल्‍या शिष्‍यवृत्‍ती परीक्षा सुरळीत पार पडल्‍या. परीक्षा दरम्‍यान जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी प‍रीक्षा केंद्रांना भेटी देवून पहाणी केली.

      पूर्व उच्‍च प्राथमि‍क व पूर्व माध्‍यमिक शिष्‍यवृत्‍ती परीक्षा इयत्‍ता पाचवी व इयत्‍ता आठवीसाठी जिल्‍हयातील 442 केंद्रावरून परीक्षा घेण्‍यात आल्‍या.  इयत्‍ता पाचवीसाठी सर्व माध्‍यमाचे एकूण 29 हजार 769 विद्यार्थ्‍यांनी अर्ज केले होते. त्‍यापैकी 25 हजार 541 विद्यार्थ्‍यांनी परीक्षा दिली. तर इयत्‍ता आठवीच्‍या 19 हजार 825 विद्यार्थ्‍यांपैकी 18 हजार 628 विद्यार्थ्‍यांनी परीक्षा दिली आहे. दरम्‍यान जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री अशोक काकडे व शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी सोनखेड येथील शिवाजी हायस्‍कुल व जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा, कारेगाव येथील जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा व जिल्‍हा परिषद हायस्‍कुल लोहा येथील परीक्षा केंद्रांना भेटी देवून पाहणी करुन समाधान व्‍यक्‍त केले. यावेळी उप शिक्षणाधिकारी बंडू अमदूरकर, गट शिक्षणाधिकारी रविंद्र सोनटक्‍के, व मिलिंद व्‍यवहारे यांची उपस्थिती होती.

किनवट  तालूक्यात परीक्षा सुरळीत


तालुक्यात एकूण 23 केंद्रावस या परिक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं.
इयत्ता 5 वी करिता 1896 विद्यार्थी
परीक्षेला बसले होते. त्यापैफी 1758
उपस्थित ; तर 138 अनुपस्थित होते.
तसेच इयत्रा 8 वी करिता 1351 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 1259 उपस्थित ; तर 92 अनुपस्थित होते. गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा विभाग प्रमुख राम बुसमवार यांनी सुनियोजनात परीक्षा सुरळीत पार पाडत्या.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News