नांदेड :
परभणी येथे सध्या कार्यरत असलेले जिल्हाधिकारी पी. सिवा संकर, भाप्रसे, यांची नांदेड येथे बदली केली असल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव (सेवा ) सीताराम कुंटे यांनी कळविले आहे.
परभणी येथे कार्यरत असलेले जिल्हाधिकारी पी. सिवा संकर, भाप्रसे, यांची नियुक्ती जिल्हाधिकारी , नांदेड या पदावर अरूण के . डोंगरे ( भाप्रसे ) यांच्या जागी ते पद वरिष्ठ समय श्रेणीत अवनत करून केली असल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव (सेवा ) सीताराम कुंटे यांनी त्यांना पत्रान्वये कळविले आहे.
तसेच त्यांनी आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार विभागीय आयुक्त , औरंगाबाद विभाग यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्यांकडे सोपवून , नवीन पदाचा कार्यभार श्री . डॉगरे ( भाप्रसे ) यांच्याकडून त्वरीत स्वीकारावा . तसेच वरीलप्रमाणे बदलीच्या पदावर रुजू झाल्यासंदर्भातील रुजू अहवाल Supremo प्रणालीवरही ( ER Sheet मधील Posting कॉलम मध्ये ) न चुकता Update करावा व तसे केल्याचे या विभागास कळवावे. असेही त्यात नमूद केले आहे.
यापूर्वी त्यांनी गडचिरोली येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, कोल्हापूर येथे मनपा आयुक्त व नाशिक येथे आदिवासी विभागाचे आयुक्त म्हणून आपली कारकिर्द गाजवली आहे. परभणी येथेही अनेक अवैध बाबीसह वाळूतस्करीला त्यांनी आळा घातला होता.




No comments:
Post a Comment