नांदेड :
आंतरराष्ट्रीय महिलादिनाच्या निमित्त
आंबेडकरवादी मिशनमध्ये दि. 8 मार्च रोजी मजूर ते उच्चशिक्षित महिलांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. हजारो महिलांच्या प्रचंड प्रतिसादात हा मेळावा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी आंतरजातीय विवाह करून आदर्श समोर ठेवण्यात आला.
बौद्ध धर्मिय सचिन सोनकांबळे (पोलीस उपनिरीक्षक) व मातंग समाजातील पूजा डोम्पल्ले यांचा आंतरजातीय विवाह मिशन केंद्रात भंते पय्याबोधी व शांतीदूत प्रतिष्ठानचे डी.पी. गायकवाड यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. कोणत्याही प्रकारे हुंडा किंवा पारंपारीक पद्धतीला छेद देवून अत्यंत साध्या पद्धतीने हा विवाह हजारो उपस्थितांच्या साक्षीने संपन्न झाला.
या प्रसंगी आयोजित आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्यानिमित्ताने न्यायाधिश श्वेता चव्हाण, न्या. अनुपमा जोंधळे, सुचित्रा रामराव भगत (महिला दक्षता प्रमुख), अश्विनी सोनसळे (विकास अधिकारी), इंजि. सविता पडघणे, इंजि. सोनकांबळे, करूणाताई तारू, दैवशिला गवंदे (रमाई प्रतिष्ठाण औरंगाबाद), छायाताई कांबळे, मिताली वाघमारे, डॉ.प्रा. रेखा वाडेकर, डॉ. स्नेहा तारू, शिल्पा जिंतूरकर, मयुरी नाईक, कांचन गायकवाड, करूणा व्यवहारे, प्रा.डॉ. जयश्री भावे, डॉ. नेहा भावे, प्रा. स्नेहल थोरात, इंजि. रोहिनी बनसोडे, भारती राठोड, डॉ. कोमल गोडबोले, इंजि. अभिलाषा नवघडे, रेखा पंडित, कुसुम बुक्तरे, डॉ. सुष्मीता ढवळे, प्रा. अनुपमा बनसोडे, प्रियंका तारू (बालविकास अधिकारी) , अॅड. सागर माने, प्रा. पुष्पलता ढगे इत्यादी मान्यवर महिलांची, अनेक बचत गट, सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या प्रसंगी उपस्थित महिलांना आंबेडकरवादी मिशनतर्फे गौरव करून प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. प्रत्येक घरातील मुलींना उच्चशिक्षित करावे, असे आवाहन प्रत्येक वक्त्यांनी केले. अंजनाबाई कागडे यांनी मजुरी करून आपल्या मुलाला डॉक्टर केले. तर जोंधळे आईंनी आपल्या मुलीला मजुरी करून न्यायाधिश बनविले, शंकुतला हाळदेकर यांनी आपल्या मुलीला ऑस्ट्रेलियामध्ये उच्च शिक्षणासाठी पाठविले. या मातेंचा प्रातिनिधीक स्वरुपात सत्कार करण्यात आला व उपस्थित महिलांना आपल्या मुलींना उच्चशिक्षण घेण्यासाठी यातून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.
मुलींच्या शिक्षणासाठी कोणतीही अडचन असेल तर आंबेडकरवादी मिशनशी संपर्क करावा, असे आवाहन याप्रसंगी दीपक कदम यांनी केले. याशिवाय संपूर्ण महाराष्ट्रातील मेहेतर (वाल्मिकी समाज)च्या मुलांना अधिकारी घडविण्यासाठी आंबेडकरवादी मिशनमध्ये निःशुल्क प्रवेश दिल्या जाईल, असे याप्रसंगी दीपक कदम जाहीर केले. याचा लाभ वाल्मिकी समाजातील पदवीधर तरूणांनी घ्यावा. परंपरागत व्यवसाय सोडून द्यावा व शिक्षणाची कास धरावी, असे आवाहन करण्यात आले.




No comments:
Post a Comment