जीवाची पर्वा न करता चाचणीसाठी कोरोनाची पहिली लस घेणाऱ्या जेनिफरला सलाम ! - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, March 22, 2020

जीवाची पर्वा न करता चाचणीसाठी कोरोनाची पहिली लस घेणाऱ्या जेनिफरला सलाम !



वॉशिंग्टन :
सध्या कोरोना विषाणुने जगात थैमान घातले आहे. सर्वदूर युध्दसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकांनी घराबाहेर पडू नये अशा सूचना प्रशासन आणि प्रसार माध्यमांमधून दिल्या जात आहेत. लोकांनी या संकटात धीर खचू न देता संयमानं सामना करावा असे सांगितले जात आहे. जगभरातील शास्त्रज्ञ आणि संशोधक आव्हान समजून या विषाणूंचा प्रतिबंध कसा करता येईल यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. त्यामध्ये अमेरिका, चीन, जपान हे देश आघाडीवर आहेत. कोरोनावरची लस शोधण्यासाठी प्रयोग, चाचण्या केल्या जात आहेत. अमेरिकेतील वॉशिंग्टन रिसर्च इन्स्टिट्यूटची एक टिम कसून कामाला लागली आहे.
             जेनिफर हैलर ही या रिसर्च मधील महत्त्वाची महिला ठरली आहे. शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या वैग्सीनचा पहिला प्रयोग तिच्यावर करण्यात आला आहे. आपला जीव धोक्यात घालून मानवी कल्याणाचे काम करणारी ही महिला जगासमोरचं आदर्श उदाहरण ठरली आहे. अमेरिकेतील एका छोट्याशा कंपनीत आॅपरेशनल मॅनेजरची नोकरी करणाऱ्या आणि सामाजिक कामात रुची असलेल्या जेनिफरला दोन मुली असून आपल्या या कामाविषयी ती खूप समाधानी आहे.
                 ती म्हणते,"जगावर एवढं मोठं संकट आल्यावर आपण स्वस्थ बसणे योग्य नाही. या विषाणूंशी लढण्याची तयारी आपण दाखवली पाहिजे. त्यासाठी काही तरी करून दाखवण्याची ही फार मोठी संधी आपणास लाभली."
                   या धाडसाबद्दल आपण जेनिफरचं  अभिनंदन आणि कौतुक करायला हवं! जीवाची पर्वा न करता चाचणीसाठी कोरोनाची पहिली लसी घेणाऱ्या अमेरिकेच्या 43 वर्षीय जेनिफर हैलरला सलाम !

1 comment:

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News