किनवट ( नांदेड ) :
तालुक्यातील पाटोदा ( बुद्रूक ) येथील एक युवक आपल्या वडीलासमवेत शेतात मिरची तोडायला गेला असता त्याचा वीज पडून मृत्यू झाला.
पाटोदा (बु )येथिल आतिष संजय सोनुले ( वय 23 वर्ष ) हा आपल्या वडीलासमवेत आपल्या शेतात मिरची तोडायला गेला होता.
शुक्रवारी (ता. 10) सायंकाळी वादळ वाचासह पाऊस सुरू झाला. काही कळायच्या आतच त्याच्या अंगावर वीज पडून तो जागेवरच मरण पावला. त्याचे वडील संजय सोनुले थोड्या अंतरावर असल्याने बचावले.
या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.




No comments:
Post a Comment