सामान्य लोकांत वावरणारा सर्वमान्य अधिकारी माणूस : भीमराव शेळके
-बालासाहेब लोणे
आकाशवाणीचे निवृत्त अधिकारी भीमराव शेळके यांच्या स्मरणाच्या निमित्ताने बालासाहेब लोणे यांची शब्दांजली -संपादक
स्मृतिशेष भीमरावजी शेळके साधा, सरळ, निगर्वी, विद्ववताचूरतेचा आव न आणणारा, सामान्य लोकांत वावरणारा सर्वमान्य अधिकारी माणूस. तसे स्मृतिशेष भीमरावजी शेळके यांच्या दोन सख्ख्या मावशा आमच्या लहानला आमच्याकडील लोणे परिवारात व त्यांचे अनेक नातेवाईक आमच्या लहानचेच असल्याकारणाने त्यांचे प्रसंगानुरुप पूर्वीपासुनच लहानला नेहमीच येणे जाणे असायचेच.
तसे मी स्मृतिशेष भीमराव शेळके यांना फार पुर्वीपासुन माझ्या शालेय विद्यार्थी दशेपासुन औपचारीकरित्या ओळखत असे म्हणजे ओळख होती. पण विद्यार्थी दशेमुळे आमची ओळख यांचा यांचा मुलगा, यांचा पुतण्या, यांचा भाऊ म्हणजे आई, वडील, चुलते, भाऊ यांच्यावरुन आमची ओळख, परंतू संगितकार मा.सदाशिवराव गच्चे व तत्कालीन दैनिक लोकमतचे नांदेड जिल्हा वृत्तप्रतिनिधी मा.मधुकर गच्चे यांच्या मा.भीमराव शेळके नेहमी संपर्कात असायचे बहुतेक १९९१ - १९९२ च्या दरम्यान आमची व मा.भीमराव शेळके यांची व हरफनमौला आकाशवाणी अधिकारी मा.अमरजी रामटेके यांच्याशी ओळख झाली व मैत्री झाली.
मा.भीमराव शेळके आमच्याशी गावकडचे नातेसंबंध विसरून मनमोकळे बोलायचे, वागयचे परंतू आम्हीच थोडे त्यांच्या वडीलकीचा मान ठेवत थोड़े भिडस्त, थोडे आंतर ठेवून वागायचो कारण ते आमच्या चुलते व त्या वयाच्या फळीतले होते. त्यामुळे आमच्यातले हे वयाचे आंतर कायम राहिले. हे स्मृतिशेष भीमरावजी शेळके यांच्याही लक्षात यायचे. मला कधीही भेटले की, म्हणायचे की, इतके लोक आकाशवाणी हे ते कागद घेवून येतात परंतू तुम्ही क्रांतिकारी लहान गावचे लोणे मंडळी कधी आकाशवाणीला येतच नाहीत. एवढे चांगले भाषण वगैरे देता. चांगले संघटन उभे केलात. आकाशवाणीवर येत जा. तुम्ही विनामूल्प सभा, केडर कॅम्प घेता आमच्या आकाशवाणीवर येवून दहा बारा मिनिटांचे भाषण केल्यास आकाशवाणी मानधन पण देतोत. परंतू मी होवून कधी आकाशवाणीवर कार्यक्रम करण्यासाठी गेलो नाही परंतू जेंव्हा केंव्हा भेटले की, आर्वर्जुन आकाशवाणीला येत चला म्हणायचे, त्यांनीही कधी मुद्दाम होवून बोलावले नाही अन सुध्दा मुद्दाम होवून कार्यक्रम करण्यासाठी गेलेलो नाहीच.
कुठे भेटले की, तुम्ही गावाकडे जात असता ? गेला होतात काय ? लहानच्या या त्या अनेक मंडळींची चौकशी करायचे. मी अनेकदा मला ही माहीत नसायचे मीही गावाकडे सगळी मंडळी ठिक आहे म्हणून ठोकून दयायचो. लहानच्या बुध्द जयंती कार्यक्रमाला आम्ही अनेकदा त्यांना गृहीत धरून हक्काने नेलेले आहे. मला पूर्वसुचना देत जा रे म्हणायचे. परंतू न रागावता फोनवर .पांढरी अंबेसॅडर गाडी घेवून यायचेच.
आकाशवाणीला मला कोणती बातमी वा निधन वार्ता सांगायची असली तरी थेट शेळके साहेबांना कधीही फोन न लावता वा थेट न सांगता तेथे काम करणाऱ्या नैमितिक उदघोषकाकडे दयायचो. कांही जण बोलताना म्हणायचे शेळके साहेबांशी तुमचे एवढे जमते पण आमच्या मार्फत का देता. इतक्या छोटया बाबीसाठी मा.भीमरावजी शेळके यांना त्रास देवू वाटत नाही सांगुन मोकळे व्हाययो. कारण फोन केला की, मग पाच सहा मिनिटे त्यांचे उपरोक्त वडीलकीचा सल्ला असायचाच.
नाही म्हटले तरीही मी दोन चारदा मा.सदाशिवराव गच्चे व मा.मधुकर गच्चे यांच्या सोबतच आकाशवाणीला गेलेलो असेल. आमच्या पहिल्या भेटीत सर्व आकाशवाणी आम्हा सर्वांना त्यांनी फिरवून आकाशवाणीची माहिती, कामकाज, रेकॉर्डींग, कसे होते, औरंगाबाद, दिल्लीचे इनपुट आऊटपुट कसे घेतो. प्रसारण याची माहिती दिल्याचे आठवते. कुठे तरी कार्यक्रमात भेट होत असेच क्षेम कुशल चौकशी व्हायची. मा.भीमरावजी शेळके प्रत्येकाप्रमाणे माझ्याशी मित्रत्वाच्या भावनने बोलायचे, वागायचे पण कोण जाणे मीच नेहमी थोडा आदरार्थी आंतर ठेवून वागत राहिलो आहे.
स्मृतिशेष भीमरावजी शेळके यांना भावपूर्ण आदरांजली.
-बालासाहेब लोणे, नांदेड
9421756489 (Wts) / 8975401662




No comments:
Post a Comment