माझ्या माहेरचे अंगण -भारती सावंत - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, July 29, 2020

माझ्या माहेरचे अंगण -भारती सावंत



माझ्या माहेरचे अंगण

-भारती सावंत

वाट घाटाची ही दूर जाते 
माझ्या माहेराच्याच गावा
जिथे थकल्या मनालाही
मिळे आईकडेच विसावा

माझ्या माहेरच्या परसात
गोठा गाईगुरे खिल्लारांचा
दुधातुपाची  चंगळ माहेरी
नाद घुंगुरमाळा या गुरांचा

मळा फुललाय हा झोकात
माय माझी रांधती दिनरात
वृद्ध बाप  पोशिंदा जगाचा
राबतो खपतो तो शिवारात

पाहूण्यांचे माहेराच्या घरी
कोडकौतुक नित्यच होई
माय  माझी अन्नपुर्णेवाणी
नाही ऋण सावकारी डोई

माझ्या माहेरच्या अंगणात
जमे सोयऱ्यांचा गोतावळा
मैफिल गप्पांची मौजमस्ती
एकमेकांचा असे कळवळा

अंगणी माझ्या माहेराच्या
वारा समाधानाचाच वाही
ऐश्वर्य सुबत्ता शांति घरात 
जणू डोळे भरूनीच पाही

तुळशीवृंदावन  अंगणात
सुटे  मंजूळांचा घमघमाट 
सायंदीप तेवताना असतो
कंकणाचाच किनकिनाट

-भारती सावंत,
मुंबई
9653445835

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News