किनवटमध्ये आज 5 बाधिताच्या भराने साखळी वाढली , 11 रुग्ण घेताहेत उपचार - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, July 30, 2020

किनवटमध्ये आज 5 बाधिताच्या भराने साखळी वाढली , 11 रुग्ण घेताहेत उपचार



किनवट : जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या "ब्रेक द चैन " च्या आवाहनाच्या उलट किनवटमध्ये बाधित रूग्णांची साखळी  वाढून आता संदर्भित 2 व येथील कोविड केअर सेंटरमध्ये नऊ असे एकूण 11 रुग्ण उपचार घेत आहेत.
              70 वर्षीय बाधित महिलेचा मृत्यू झाल्याने तसेच आज 2 रुग्ण आढळल्याने मोमीनपूरा, 54 वर्षिय बाधिताचा मृत्यू झाल्याने व काल 3 बाधित आढळल्याने तल्लारीगाव, आधिचे दोन व आज नवीन रूग्ण आढळल्याने एस.व्ही.एम. कॉलनी, काल एक व आज एक रूग्ण आढळल्याने इस्लामपूरा उपविभागीय अधिकारी महेश वडदकर यांनी कंटेन्मेंट झोन जाहीर केला आहे.
               कंटेन्मेंट झोनची तहसिलदार उत्तम कागणे, गटविकास अधिकारी सुभाष धनवे, गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने, उप विभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक, पोलिस निरिक्षक मारोती थोरात, सहायक पोलिस निरीक्षक सुशांत किनगे , मुख्याधिकारी निलेश सुंकेवार यांनी पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या.
                  डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय,गोकुंदा येथे 6 कोविड केअर सेंटर, किनवट येथे 3 वसंदर्भित 2 अशा एकूण 11 रुग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. असे वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी कळविले आहे.

शहरालगतच पश्चिमेला पैनगंगा नदी ही विदर्भ सीमा आहे. दोन किमी अंतरावरच खरबी गाव ( ता. उमरखेड जि. यवतमाळ ) आहे.येथील एक रूग्ण किनवटमध्ये बाधित आढळला.  याच खरबीकडे दररोज सकाळी किनवटमधून व्ही.आय.पी. फिरायला जातात. तिथलाच व्यक्ती आता बाधित आढळल्याने तिकडे जाणारी पावलं थांबलीत.
किनवट तालुक्याची कोरोना विषयी संक्षिप्त माहिती पुढील प्रमाणे
दि. 30/07/2020  सायं. 07 वाजता
घेतलेले एकूण स्वॅब- 179,
निगेटिव्ह स्वॅब- 135,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 5
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 18, 
स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 19
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-1, 
मृत्यू संख्या-  निरंक, 
रुग्णालयातून सुट्टी दिलेली एकूण संख्या- 7,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-11,
      

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News