लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न द्या -संभाजी ब्रिगेड - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, August 1, 2020

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न द्या -संभाजी ब्रिगेड


किनवट (ऍड. विलास सूर्यवंशी) : कष्टकऱ्यांच्या चळवळीत आणि संयुक्त महाराष्ट्राच्या नवनिर्मितीच्या लढ्यात अण्णाभाऊ साठे यांचे लोकशाहीर म्हणून असलेले योगदान सारा महाराष्ट्र जाणतोच ; परंतु अण्णाभाऊ साठे यांच्यामध्ये एक गीतकार, कादंबरीकार, कथाकार, पटकथाकार ,नाटककार, पत्रकार आणि कष्टकऱ्यांच्या चळवळीवर अपार निष्ठा असलेला एक सामान्य कार्यकर्ताही होता.
                 पोवाडे ,लावण्या ,गीतं ,पद या काव्यप्रकारांचा त्यांनी सन्मान कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला. स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेलं योगदान महत्त्वाचं आहे. भारतीय भाषांमध्ये त्यांचे साहित्य अनुवादित झालेच पण धर्मजातीच्या देशकाळाच्या सीमा ओलांडून ते जर्मन, झेक इंप्लिश, स्लोव्हाक, पोलिश, रशियन या परकीय भाषांमध्ये भाषांतरित झाले. रशियन सरकारने त्यांचा रशियात बोलावून यथोचित सत्कार केला होता,रशियात दरवर्षी त्यांची जयंती साजरी केली जाते. पुरोगामी व बहुजनवादी समाजाचे महत्वाचे स्फूर्तीस्थान असलेले महानायक अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मानाने पुरस्कृत करण्यात यावे असे निवेदन उपविभागीय अधिकारी किनवट यांच्यातर्फे शासनास देण्यात आले. नायब तहसिलदार मोहम्मद रफीक यांनी निवेदन स्वीकारले. सदर निवेदनावर
शिवश्री. बालाजी पाटील सिरसाट,
संभाजी ब्रिगेड नांदेड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख 
शिवश्री.सचिन पाटील कदम,
संभाजी ब्रिगेड किनवट तालुकाध्यक्ष
शंकर भंडारे, आदर्श जागरलावार, ब्रम्हा येडके. यांच्या सह्या आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे भारतरत्न पुरस्कारास पात्र आहेत म्हणजेच त्यांचे व्यक्तिमत्त्व देशाला खूप काही देऊन गेले . जो या देशासाठी करतो म्हणजेच या देशाच्या संस्कृतीचे संवर्धन तसेच या देशाच्या सर्वांगीण विकासासाठी, साहित्याच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी जीवनभर प्रयत्न केले आहेत, त्या प्रयत्नला म्हणजेच त्या कार्याला सन्मान देण्यासाठी म्हणजेच सर्वसामान्यांमध्ये सदर विचाराची जानीव होण्‍यासाठी म्हणजेच अंमलबजावणी होण्यासाठी सदर पुरस्कार देणे अभिप्रेत आहे . संभाजी ब्रिगेड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख हे सतत सामाजिक जाणिवेतून समाजाच्या विकासासाठी म्हणजे सामाजिक उन्नती हेच ध्येय समोर करून त्यांनी समाजाच्या विकासात्मक दृष्टिकोनाचे मुद्दे उचलून धरतात व शासनाला त्या मुद्द्यानुसार अनुकूल परिस्थिती निर्माण करण्यास भाग पाडतात. अशा या महान व्यक्तिमत्वाच्या  लोकशाहीराला देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देणे हे गरजेचे आहे यासाठीच आजचे निवेदन देण्यात आले असे संभाजी ब्रिगेड जिल्हा प्रसिद्धीप्रमुखांतर्फे सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News